कोल्हापूर : आई व मुलाच्या भावनिक नात्याचा हळूवार उलगडा, सोबत बालचमूंचे भन्नाट नृत्याविष्कार, जादूचे प्रयोग आणि स्पॉट ‘गेम शो’ने उपस्थित लोकमत ‘सखी मंच’ व बालमंच सदस्यांची बुधवारची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘झी टीव्ही’ आयोजित ‘सुपर मॉम, स्मार्ट किड्स’ या स्पर्धेचे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने आई आणि मुलांच्या नात्यातील विविध पैलू पाहायला मिळाले. एकूण चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा झाली. पहिल्या स्वपरिचय फेरीत आईने व मुलांनी आपापला परिचय करून दिला. दुसऱ्या कलाविष्कार फेरीमध्ये दोघांनी मिळून नृत्य, अभिनय, मिमिक्री, गायन, वादन अशा कला सादर केल्या. तिसरी फेरी म्हणजे ‘दिल तो बच्चा हैं जी...’ यात आईने मुलाची व मुलाने पालकाची भूमिका बजावली. चौथ्या फेरीत परीक्षकांकडून काही प्रश्न आईला व मुलांना विचारण्यात आले. अशा चार फेऱ्यांत आई-मुलांच्या नात्यातील हळूवारपणा, त्यांची परस्परांशी असलेली जवळीक, एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नांना उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ललिता शिंदे, अमृता वासुदेवन यांनी काम पाहिले तर स्केचिंग स्पर्धेचे परीक्षण सत्यजित निगवेकर यांनी काम पाहिले. दरम्यान, ‘सुपर मॉम, स्मार्ट किड्स’ या स्पर्धेदरम्यान मुलांसाठी स्केचिंग स्पर्धा घेण्यात आली. ड्रॉर्इंगचे साहित्य ‘लोकमत’कडून पुरविण्यात आले. त्यावेळी मुलांना ‘ब्रह्मराक्षस’ हा विषय देण्यात आला होता. अवघ्या काही मिनिटांतच मुलांनी आपल्या मनातील ‘ब्रह्मराक्षसा’ला कागदावर कैद केले. माहेश्वरी गोखले यांनी विविध ‘गेम शो’च्या माध्यमातून सखींसह बालमित्रांना खिळवून ठेवले. (प्रतिनिधी) सुपर मॉम, स्मार्ट किडस्स्पर्धेतील विजेते....१) ब्रह्मराक्षस स्केचिंग स्पर्धेचा अनुक्रमे निकाल : राजस पाटील, करण आनंदराव, जान्हवी आकुलवार, उत्तेजनार्थ : विद्धेश पवार, दीप देशमुख २) फॅन्सी ड्रेस : रेहान नदाफ, सिद्धी नाईक३) सुपर मॉम, स्मार्ट किडस् स्पर्धा : गीता कुलकर्णी व श्रीजा कुलकर्णी, रोजालिना गॉडद आणि नीशेल, तेजल गॉडद, आफ्रीन बारगीर आणि फरदीन बारगीर४) बेस्ट जोडी : वनिता बक्षी आणि वरद बक्षी ५) बेस्ट परफॉर्मन्स : प्रफुल्लता बिडकर आणि अथर्व बिडकर ६) बेस्ट कॉस्च्युम : रेहान नदाफ आणि अफसाना नदाफ‘ब्रह्मराक्षस’चे मुलांना आकर्षणझी टीव्हीतर्फे ब्रह्मराक्षस ही नवीन मालिका ६ आॅगस्टपासून दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होते. बालाजी टेलिफिल्म्स्च्या या मालिकेत मुख्य भूमिका अहम शर्मा, रक्षंदा खान, किश्वर मर्चंट आणि क्रिस्टल डिसूजा यांनी केल्या आहेत. ब्रह्मराक्षस ही युवती रैनाची गोष्ट आहे. जी मुंबईहून एका लग्नासाठी कमलापूरला येते. तिथे रैना व रिषभ आपल्या एका प्रिय व्यक्तीला गमवितात. जी ‘ब्रह्मराक्षसा’च्या आहारी गेली असते. ब्रह्मराक्षस हा नववधूंचे कुंकू, चुडा व पंैजण पाहून आक्रमक होत असतो. या ब्रह्मराक्षसाचा पर्दाफाश करण्यासाठी रैना व रिषभ कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची योजना आखतात. ‘गिली-गिली छूँ..’‘गिली-गिली छूँ...’ असा मंत्र म्हणत जादूच्या बॉक्समधून विविध वस्तू काढणे, तोंडातून रंग-बेरंगी कागद काढणे, कपड्यांचा रंग बदलणे अशा नवनवीन चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार गुरुदास यांनी उपस्थित बालमित्रांनाच नाही तर पालकांनाही आपल्या मायाजालात अडकवून ठेवले. नृत्याविष्कार....रूद्रांश अकॅडमीच्या बालकलाकारांनी नृत्य सादर करून बालमंच सदस्यांसह सखी मंच सदस्यांना डोलण्यास भाग पाडले. यामध्ये राधिका काणे, स्वीटी जत्राटकर, यशदा डुरे, रितेश सकटे, ज्ञानदीप गिरजे, विश्वजित वाडकर यांनी नृत्यकला सादर केली.
आई-मुलांच्या भावनिक नात्यांचा उलगडा
By admin | Published: October 28, 2016 11:50 PM