शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

Kolhapur: लघुउद्योजकांचा 'विकास' कधी?, जागेचा तिढा सुटेना; उद्योगमंत्र्यांना विसर

By पोपट केशव पवार | Published: September 24, 2024 5:51 PM

लघुउद्योजकांची जागा क्रिकेट स्टेडियमला

पोपट पवार कोल्हापूर : जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाला सर्वाधिक बळ देणाऱ्या लघुउद्योजकांसाठी विकासवाडी (ता. करवीर) येथे २० हेक्टर जागा देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, एक वर्ष झाले तरी या जागेचा प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाकडे प्रलंबित आहे. मागून आलेला क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, लघुउद्योजकांच्या जागेबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने लघुउद्योजकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित या तिन्ही एमआयडीसींमध्ये साडेतीन हजारांहून अधिक लघुउद्योजक आहेत. मशीन शॉप, फॅब्रिकेटर्स व फाउंड्री उद्योगाशी संलग्नित विवध छाेटे उद्योग या एमआयडीसींमध्ये कार्यरत आहेत. काही ठराविक अपवाद वगळता बहुतांश सर्वच छोटे उद्योग भाड्याच्या जागेत असल्याने सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा या उद्योजकांना मिळत नाहीत. त्यामुळे लघुउद्योजकांना एमआयडीसींमध्ये हक्काची जागा द्या, अशी मागणी इंजिनिअरिंग कंपोनंट्स मशिनिंग ओनर वेल्फेअर असोसिएशन (एक्मो) या संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून लावून धरली होती.त्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी विकासवाडी येथे एमआयडीसीची २० हेक्टर जागा लघुउद्योजकांना देण्याची घोषणा केली. विकासवाडी येथे प्रस्ताविक एमआयडीसीचा प्रस्तावही पुणे विभागीय कार्यालयाकडे गतवर्षी पाठवण्यात आला. मात्र, त्यानंतर या जागेबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतीच हालचाल झालेली नाही. उद्योगमंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला की लघुउद्योजकांना जागा न देता नुसते झुलवत ठेवायचे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लघुउद्योजकांची जागा क्रिकेट स्टेडियमलाविकासवाडी येथील एमआयडीसीच्या ताब्यातील २० हेक्टर जागा लघुउद्योजकांना देण्याचे उद्योगमंत्र्यांनी जाहीर केले होते. आता याच जागेतील १२ हेक्टर जागा क्रिकेट स्टेडियमला दिली आहे. सर्वाधिक महसूल, सर्वाधिक रोजगार उपलब्धी करूनही आमच्यावरच अन्याय का? असा सवाल ‘एक्मो’चे अध्यक्ष अमित पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या ९० टक्के लघुउद्योजकांनी भाड्याच्या जागेत उद्योग उभारले आहेत. लघुउद्योजकांना हक्काची जागा मिळाली तर शासनाच्या सर्व सुविधा, बँकांचे कर्ज मिळू शकते. लघुउद्योगांमुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारने त्वरित जागा द्यावी. - अमित पाटील, अध्यक्ष, इंजिनिअरिंग कंपोनंट्स मशिनिंग ओनर वेल्फेअर असोसिएशन (एक्मो) 

एमआयडीसी प्रशासनाने उद्योगांसाठी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. लघुउद्योजकांच्या जागेचाही प्रश्न त्यांनी सोडवावा. - स्वरूप कदम, अध्यक्ष, गोशिमा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसीUday Samantउदय सामंत