शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Kolhapur News: वादग्रस्त स्टेटस..वातावरण स्फोटक; सोशल मीडियाच्या वापरास हवे गांभीर्य

By उद्धव गोडसे | Published: March 23, 2023 2:07 PM

सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वादग्रस्त स्टेटस ठेवणे, महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

गावोगावी हवे प्रबोधनसोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला वापर केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, गैरवापरामुळे स्वत:सोबत समाजाचेही नुकसान होते. याची वेळीच तरुणांना जाणीव करून देण्यासाठी गावोगावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.घटना पहिली - सावर्डे (ता. हातकणंगले) येथे एका तरुणाने महापुरुषांच्या बदनामीचा स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवला. या घटनेचे पडसाद परिसरातील मिणचे आणि खोची या गावांमध्ये उमटले. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला निदर्शनांनी उत्तर देण्यात आले. तरुणांनी गावोगावी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ वडगाव पोलिस ठाण्याबाहेर जमावाने ठिय्या मारला आणि गावोगावी बंदही पाळण्यात आला.घटना दुसरी - व्यवसायानिमित्त शिरोळमध्ये येऊन राहिलेल्या एका कुटुंबातील तरुणाने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा स्टेटस ठेवला. काही तासांत हा स्टेटस व्हायरल झाला आणि शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले. संबंधित तरुणाच्या विरोधात निदर्शने सुरू असतानाच तक्रारदार तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले. अखेर पोलिसांनी दोषीवर गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाला गाव सोडून जावे लागले.सामाजिक स्वास्थ्य धोक्यातसोशल मीडियातील वादाचे परिणाम काही क्षणात समाजावर होतात. बंद, निदर्शने यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते. शाळा, महाविद्यालये यासह दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आर्थिक व्यवहारही मंदावतात. जाती-धर्मामध्ये तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.तरुणाईचे भवितव्य अंधारातसोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. एखाद्या चुकीच्या कृतीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची काहीच कल्पना नसणारे तरुण बेफिकीरपणे वाटेल ते मेसेज फॉरवर्ड करतात. निदर्शने, मोर्चांमध्ये ते सहभागी होतात. यामुळे होणाऱ्या पोलिस कारवाईनंतर तरुणांचे करिअर धोक्यात येते. याचा तरुणांसह त्यांच्या पालकांनीही वेळीच विचार करण्याची गरज आहे.हे करणे टाळा

  • सोशल मीडियात वादग्रस्त मेसेज करू नका
  • वाद निर्माण होतील, असे स्टेटस ठेवू नका
  • चिथावणीखोर भाषेचा वापर टाळा
  • गुन्हेगार, गुंडांचे उदात्तीकरण नको
  • धार्मिक मुद्द्यांवर चुकीचे भाष्य करू नये
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको
  • निदर्शने, मोर्चे, रॅली यात सहभाग टाळा

सोशल मीडियातील चुकीच्या मेसेजमुळे निर्माण होणारा तणाव संपूर्ण समाजाची शांतता धोक्यात आणतो. याचे दीर्घकालीन परिणाम उमटत राहतात. त्यामुळे तरुणांनी जपून सोशल मीडियाचा वापर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी