शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

By admin | Published: September 17, 2015 11:36 PM

परस्परविरोधी तक्रारी : सहायक वाहतूक निरीक्षकांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप

सातारा : मुंबई-आजरा प्रवासात इंजिनातील बिघाडामुळे एक ना दोन, तब्बल चार गाड्या बदलाव्या लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. प्रवास सुरू असताना सहायक वाहतूक निरीक्षकांना अनेकदा फोन करूनही त्यांनी तो घेतला नाही आणि नंतर स्वत: फोन करून शिवीगाळ केली, असा आरोप प्रवाशांनी केला. यासंदर्भात प्रवाशांनी, तर तोडफोडप्रकरणी एस.टी. प्रशासनाने चार प्रवाशांविरुद्ध तक्रार दाखल केली.प्रवासी, एस.टी.चे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या काचा प्रवाशांनी फोडल्या. आतील संगणक, दोन माईक आणि फोनचेही नुकसान केले. यावेळी झालेला आरडाओरडा आणि गोंधळामुळे बसस्थानकावरील इतर प्रवाशांबरोबरच एस.टी.चे कर्मचारीही प्रचंड घाबरले. सुमारे तासभर तणावपूर्ण वातावरण होते. त्यानंतर एस.टी. प्रशासनाने शिवाजी यशवंत बोरवडकर (वय ३५, रा. माद्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदीप मारुती बिवळेकर (३५, रा. झुलपेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर), संजय नारायण देवलकर (४२, रा. चाफवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर), आणि श्रीपती महादेव राजगोळे (५२, रा. न्यू पनवेल, जि. रायगड) या चार प्रवाशांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना समज दिली. ‘यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल,’ अशी नोटीस चौघांना बजावल्यानंतर दुपारी एक वाजून एक मिनिटांनी प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला.दरम्यान, एकापाठोपाठ एक अशा चार बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांपैकी श्रीपती महादेव राजगोळे यांनी सहायक वाहतूक निरीक्षक जी. बी. किरते यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. तथापि, तब्बल ३० वेळा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही, असे राजगोळे यांनी सांगितले. नंतर किरते यांनीच राजगोळे यांना उलटा फोन केला. तेव्हा झालेल्या बाचाबाचीत किरते यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप राजगोळे यांनी केला आहे. राजगोळे हे मुंबईत ‘बीईएसटी’मध्ये चालक म्हणून काम करतात. किरते यांच्याविरुद्ध त्यांनी शहर पोलीस ठाण्यात शिवीगाळीची तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी) आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.