जयसिंगपूर : भाजीपाल्यामुळेच कॅन्सर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. कीटकनाशकांबाबत अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हा समज चुकीचा आहे. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी शेतकºयांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन जयसिंगपूर येथे झालेल्या शेतकरी व ग्राहक परिषदेत करण्यात आले.
येथील सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात गुरुवारी शिरोळ तालुक्यातील शेतकरी कॅन्सरदाता की अन्नदाता शेतकरी व ग्राहक परिषद पार पडली. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत आहे. याबाबत शेतकºयांची नाहक बदनामी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित नरदे, संजय कोले, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी चित्रफितीद्वारे कॅन्सर व कीटकनाशकांबाबत माहिती देण्यात आली.
मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत लाड म्हणाले, दोन हजार वर्षांपूर्वी कीटकनाशके नव्हती, त्यावेळी कॅन्सर होता. माणसाच्या शरीरात होणारे बदल, राहणीमान, दारू, गुटखा, तंबाखू, फास्टफुडचे सेवन, स्थुलता ही प्रमुख कॅन्सरची कारणे आहेत. माणसाचे आयुष्यमान वाढत चालले असले तरी ते कॅन्सरसाठी धोकादायक बनले आहे. महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण दिसून येते. मासिक पाळीतील अनियमितता ही प्रमुख कारणे आहेत. कॅन्सरवर औषधे घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पंचगगा नदी प्रदूषणाचाही शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पिकांना दिले जाणारे पाणी, पिण्याचे पाणी याची तपासणी केली पाहिजे. वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे.
उत्पन्नवाढीसाठी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, चांगल्या कंपन्यांकडूनच औषधे घेणे गरजेची आहेत. सफरचंद, टोमॅटोमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला ही मिठाच्या पाण्यात धुऊनच आहारात घेणे गरजेचे आहे. नव्या पिढीमध्ये स्थुलतेचे प्रमाण वाढले आहे. केवळ कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हे म्हणणे चुकीचे असून त्याबाबत संशोधन सुरू आहे. त्याला अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण नाही. श्रेणिक नरदे यांनी आभार मानले.चुकीचा संदर्भअजित नरदे म्हणाले, आॅस्ट्रेलियामध्ये ८० टक्के कॅन्सरचे प्रमाण आहे. एकूण ३६ देशांचा अभ्यास केल्यास त्यात भारताचा क्रमांक लागत नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर हा संदर्भ चुकीचा आहे. अमेरिकेतील रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हे चुकीचे आहे. शिरोळ तालुक्यात केवळ अफवा पसरविली जात आहे. समाजात केवळ भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. हा अपप्रचार खोडून काढण्याची गरज बनली आहे. त्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे. तरच तालुकाभयमुक्त होणार आहे. यावेळी सिद्धाप्पा दानवाडे (दत्तवाड) या शेतकºयाचा सत्कार करण्यात आला.जयसिंगपूर येथे शेतकरी व ग्राहक परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत लाड. शेजारी सिद्धाप्पा दानवाडे, संजय कोले, अजित नरदे, श्रेणिक नरदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.