गतवर्षी एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यात माळभागावरील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेचे छत उडून गेले होते. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने व आर्थिक तरतुदीअभावी दुरुस्तीचे काम रखडले होते.
लॉकडाऊननंतर शाळा सुरू झाली तरी शाळा दुरुस्तीचे काम न झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत होता शिवाय काही संघटनांनी आंदोलनही केले होते.
जि. प. सदस्य भोजे यांनी या कामासाठी जिल्हा परिषद फंडातून दहा लाखाचा निधी मंजूर करुन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने शिक्षक, पालकांसह विद्यार्थीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, उपसरपंच संभाजी कोळी, प्रा. चंद्रकांत मोरे, सातगोंडा पुजारी, शक्ती पाटील, विश्वास बालिघाटे, शिवानंद कोरबू यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे जि. प. शाळा दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, जि. प. सदस्य विजय भोजे, पोपट पुजारी, प्रा. चंद्रकांत मोरे उपस्थित होते.