कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ८ किंवा ९ जुलै ही तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. यावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कदाचित सोमवारी अधिकृतपणे जिल्हा परिषदेकडे निवड कार्यक्रम पाठवला जाईल.
अध्यक्ष बजरंग पाटील यांनी २३ जून रोजी राजीनामा दिल्यानंतर तो प्रतिनियुक्त व्यक्तीकडून पाठवून त्याला २४ जून रोजी विभागीय आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली. याच दिवशी मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तसेच उपाध्यक्षांसह चार सभापतींचे राजीनामेही प्रक्रिया होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
आता हा निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर होणार आहे. त्यानंतर त्याची नोटीस काढण्यासाठीची लेखी सूचना जिल्हा परिषदेेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे येईल. त्यानंतर ती ६७ सदस्यांना लागू करण्यात येईल.
चौकट
सामाजिक अंतराचा मुद्दा
जिल्हा परिषदेचे ६७ सदस्य, उपस्थित राहणारे १२ सदस्य, महसूल आणि जि. प. आवश्यक कर्मचारी असे किमान ११० जण सभागृहात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून ही निवड करताना प्रशासनाचीही कसरत होणार आहे.