दादा जनवाडे
निपाणी : येथील समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी व चिकोडी तालुक्यातील २५ पेक्षा जास्त गावांमध्ये तीन लाख लोकांना गूळवेल काढ्याचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर दहा हजार लोकांना इम्युनिटी बुस्टरचे वाटप केले असून दररोज पंधरा हजार लोकांना हा काढा वाटला जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा उपक्रम सुरू असून यामुळे कोरोना प्रतिबंधास मदत झाली आहे.
निपाणी येथील विरुपाक्षलिंग समाधी मठ व प्राणलिंग स्वामीजी हे नेहमीच रस्त्यावर उतरून प्रत्येक संकटात समाजाच्या हितासाठी काम करत असतात.
गतवर्षी आलेल्या कोरोणाच्या लाटेत घरपोच भाजीपाला व तयार जेवण वाटप करण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला होता. प्राणलिंग स्वामीजी निपाणीतील व्यावसायिक यांच्या मदतीने येथील समाधी मठ परिसरात दररोज गूळवेल काढा तयार करण्यात येतो. या ठिकाणाहूनच त्याचे वितरण करण्यात येत असते. दररोज ५ हजार लिटरपेक्षा जास्त काढा बनवला जातो व याचे वाटप केले जाते. या सर्व कार्यात विकास विश्वकर्मा, शिवगोंडा मतकरी, प्रकाश कांबळे, संजीव नरके, विरुपाक्ष पुजारी, सदाशिव राबते, सागर श्रीखंडे यासह सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. राष्ट्रकर्म या संस्थेचे या कार्यात मोठे योगदान आहे.
शिरगुप्पी येथे मदत कार्य
तालुक्यातील शिरगुप्पी येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण अतिशय जास्त होते. याच वेळी शिरगुपी येथे ६०० बॉटल इम्युनिटी बुस्टर व सलग चार ते पाच दिवस प्रत्येक घरी गूळवेल काढा वाटण्याचे काम स्वामीजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यामुळे गावात कोरोना प्रतिबंधास मोठी मदत झाली होती.
मठाचे विविध उपक्रम
गोशाळा, अन्नक्षत्र, मोफत वसतिगृह, योगा, प्राणायाम, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गटकोट मोहीम,
फोटो : निपाणी : येथे समाधी मठात काढा बनविण्यात येतो. २. प.पु. प्राणलिंग स्वामीजी