यड्राव : येथील ग्रामस्थांना पाणी वितरणाची वेळ निश्चित नसल्याने रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिलांसह सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पाण्याचे वितरण दिवसा करावे, अशा ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासक भाऊसाहेब टोणे यांना देण्यात आले.
यड्रावमध्ये बेघर वसाहत येथील पाण्याच्या टाकीतून गावठाण बेघर वसाहत व गावभागातील काही भाग, ऑटो इंडिया शेजारील पाण्याच्या टाकीमधून रेणुकानगर उत्तर व दक्षिण भाग, पडियार वसाहत, आर. के. नगर, पार्वती हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी अपार्टमेंटसह इतर भागात पाणी वितरण करण्यात येते. त्याचप्रमाणे जांभळी येथील कूपनलिकेचे पाणी गावभागातील बहुतांशी भागात पुरवठा होतो.
ग्रामस्थांना पाणीपुरवठ्याचे नियोजन बहुतेक वेळी रात्री-अपरात्री होत आहे. यावेळी वितरित होणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांसह महिलावर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी व्हावा म्हणून पाणी वितरणाचे नियोजन दिवसभरात करावे, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीचे प्रशासक टोणे यांना देण्यात आले.
याप्रसंगी महावीर पाटील, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, रोहित कदम, सुमित रुगे, उदय कुंभार, तात्यासो दानोळे, अक्षय प्रभाळकर, सुमीर सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १००२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांच्यावतीने मागणीचे निवेदन प्रशासक भाऊसाहेब टोणे यांना देण्यात आले. यावेळी महावीर पाटील, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, रोहित कदम, सुमित रुगे, उदय कुंभार, तात्यासो दानोळे, अक्षय प्रभाळकर, सुमीर सुतार उपस्थित होते.