कोल्हापूर: हजारो गुंतवणुकदारांची मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस ट्रेडर्सवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यातील मुख्य सुत्रधार लोहितसिंग सुभेदारसह २८ संचालकांपैकी काही संचालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान शुक्रवारी पसार संचालक नामदेव पाटील यास गुन्हे अर्थिक शाखेच्या पोलिसांनी खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथून गुंतवणुकदार कृती समितीच्या मदतीने अटक केली.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून सुभेदारसह सर्व संचालक पसार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने लोहितसिंगसह ९ संचालकांना जेरबंद केले. नामदेव पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. तो गगनबावड्यातील खोकुर्ले येथील फाॅर्म हाऊसवर असल्याची माहिती एलएलपी कृती समितीच्या सदस्यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन शोधाशोध केली. त्यांना या ठिकाणी तो आढळून आला. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना समिती सदस्यांनी आर्थिक गुन्हे शाखेस माहिती दिली. त्यानूसार गगनबावडा पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.दुचाकी मॅकेनिक ते संचालकनामदेव पाटील हा कोल्हापूरातील शाहूपुरीमध्ये दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. चार वर्षात त्याने या ट्रेडर्स कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधीची माया जमविली.
kolhapur: ए.एस ट्रेडर्सचा पसार संचालक नामदेव पाटील पोलिसांच्या ताब्यात, कोट्यवधीची माया जमविली
By सचिन भोसले | Published: October 06, 2023 6:12 PM