नवे
पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची व कुटुंबांची काळजी घेत नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. मदतीची गरज भासेल तेव्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले.
तळसंदे (ता.हातकणंगले) येथे स्थलांतरित लोकांसाठी रिलायन्स व आत्मसौंदर्य फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटपप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे बोलत होते. रिलायन्स फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्रचे व्यवस्थापक मारुती खडके अध्यक्षस्थानी होते.
आत्मसौंदर्य फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, रिलायन्स फाउंडेशनचे राज्य व्यवस्थापक दीपक केकन, श्रीकांत पाटील,रवींद्र डोईजड, प्रवीण पाटील, रसिका डोईजड यांची भाषणे झाली.
--------
फोटो ओळी : तळसंदे येथे रिलायन्स व आत्मसौंदर्य फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे. सोबत मारुती खडके, प्राजक्ता चव्हाण, रसिका डोईजड, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.