कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वस्तूंमध्ये तांदूळ, साखर, तेल, तूरडाळ, कांदे, बटाटे, बिस्कीट, पालेभाजी यांचा समावेश होता. या वाटपावेळी मराठा महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील, प्रतीकसिंह काटकर, दिग्विजय काटकर, पियुष तेजवणी, हर्षवर्धन जाधव उपस्थित होते.
फोटो (०७०५२०२१-कोल-मराठा महासंघ) : कोल्हापुरातील गरीब कुटुंबांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अवधूत पाटील, प्रतीकसिंह काटकर, आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहूंना अभिवादन
कोल्हापूर : येथील लोकराज्य जनता पार्टीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. सानेगुरूजी वसाहत येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघटक शशिकांत जाधव, विश्वनाथ पाटील, सर्जेराव भोसले, जयश्री चव्हाण, विलासराव भिंगे उपस्थित होते.
कोरोनाचा धोका असल्याने घरीच राहा
कोल्हापूर : कोरोनाचा धोका असल्याने सर्वांनी सावधगिरी बाळगून घरीच राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव सुंदरराव देसाई यांनी केले. सर्वोदय मंडळ, जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे शुक्रवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. सुजय देसाई यांनी केले. या बैठकीत सदाशिव मनुगडे, डी. डी. चौगुले, सिद्राम तुपद, सखाराम सुतार, बाबुराव हसुरे, सविता देसाई, शांताताई पाटील, छाया भोसले सहभागी झाल्या होत्या.
===Photopath===
070521\07kol_2_07052021_5.jpg
===Caption===
फोटो (०७०५२०२१-कोल-मराठा महासंघ) : कोल्हापुरात कोरोनामुळे अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शेजारी अवधूत पाटील, प्रतिकसिंह काटकर, आदी उपस्थित होते.