कोल्हापूर : येथील राजस्थानी जैन समाजाच्या गोल्डन ग्रुपच्यावतीने पर्युषण पर्वानिमित्त गगनबावडा येथील गोशाळेतील ९५ गाईंसाठी ५ टन सुका चारा देण्यात आला. कत्तलीसाठी नेत असताना पकडलेल्या गाई असळज येथील मल्लाप्पा सूर्यवंशी प्रतिष्ठान संचलित, गुरू गोरक्षनाथ गोशाळेत सोडल्या जातात. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राजस्थानी जैन समाजाच्यावतीने पाच टन सुका चारा, सहा फॅन व पंधरा लाईट बल्ब देण्यात आले. यावेळी गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष पारस ओसवाल, उपाध्यक्ष रमेश ओसवाल, सचिव सुरेश ओसवाल, राजू कांगटाणी, राजू ओसवाल, हिंमत राठोड, अरविंद ओसवाल, महेंद्रकुमार ओसवाल आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मकरंद सूर्यवंशी, गजानन परीट यांनी स्वागत केले. विक्रांत भागोजी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : राजस्थानी जैन समाजातर्फे पर्युषण पर्वानिमित्त असळज येथील गुरू गोरक्षनाथ गोशाळेसाठी पाच टन चारा देण्यात आला. (फोटो-०६०९२०२१-कोल-राजस्थानी)