बुबनाळसह शेडशाळ ,गणेश वाडी, आलास, कवठेगुलंद , औरवाड, व गौरवाड नदीपलीकडे सात गावात संकटावेळी नेहमी आमदार प्रकाश आवडे यांनी धाव घेतली. यावर्षी निर्माण झालेल्या महापूर संकटात जवाहर साखर कारखान्यामार्फत जनावरांना चारा उपलब्ध करून दिला आहे.
कवठेगुलंद, शेडशाळ ,गणेशवाडी, आलास, बुबनाळ, औरवाड, व गौरवाड या गावात महापुराचे पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्यांच्या सोबत जनावरेही आहेत. या जनावरांना कवठेगुलंद माळ भाग येथील चारा छावणीत हलवण्यात आली आहेत. त्यामुळे जनावरांना जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून चारा देण्याचे जाहीर केले होते व जनावरांना चारा उपलब्ध करून दिला आहे
यावेळी वाटप करताना जवाहर कारखान्याचे संचालक श्री सुकुमार किनिंगे , विजय कुंभोजे, बुबनाळचे माजी सरपंच विद्याधर मरजे, व पूरग्रस्त शेतकरी