कोल्हापूर : कम्युनिटी किचनबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या आवाहनाला हॉटेल आनंद कोझीने प्रतिसाद देत दोनशे जणांचे जेवण करुन दिले. जिल्हा प्रशासनच्यावतीने साळोखेनगरमध्ये असणाऱ्या परराज्यातील शंभर कामगारांना जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर, कामगारांची जेवणासाठीची गैरसोय होवू नये, म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी कम्युनिटी किचन सुरु करण्याचे आवाहन केले. त्याला आम्ही प्रतिसाद दिला.दोनशे जणांचे जेवण करुन दिले. त्यासाठी आवश्यक साहित्य तहसिलदारांनी उपलब्ध करुन दिले. जेवणाच्या पाकिटांचे वाटप जिल्हा प्रशासनाने केले. प्रशासनाच्या आवाहन आणि गरजेनुसार मदत केली जाईल, असे कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी गुरुवारी केले.