इचलकरंजी : येथील रोटरी परिवाराच्यावतीने गरजू दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर दोन दिवस अग्रसेन भवन येथे झाले. शिबिरासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ३८० दिव्यांग सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी साधू वासवानी मिशनचे प्रमुख सुंदर वासवानी व अरुणकुमार गोयंका यांनी दीपप्रज्वलन करून शिबिरास प्रारंभ केला. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी रोटरी डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मनीष मुनोत व क्लबचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सतीश राठी, एस. एन. अग्रवाल यांच्यासह रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, अग्रसेन सेवा ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी
१६०३२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत रोटरी परिवाराच्यावतीने गरजू दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर झाले.