कोल्हापूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत पंप मंजुरी आदेश प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चार लाभार्थ्यांना वितरित केले. शेतकरी हितासाठीच्या नवीन कृषी पंप वीजजोडणी धोरणाचे कौतुक करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचनाही महावितरणला केली.शाश्वत व स्वच्छ इंधनाचा स्रोत असलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येते आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार ५ ते १० टक्के पंपाच्या मूळ किमतीच्या रकमेचा भरणा केल्यानंतर अनुदान तत्त्ववावर सौर कृषी पंपाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेनुसार अपारंपरिक वीज जोडणी उपलब्ध नसलेल्या अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले गेले आहे.अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी जिल्ह्यातील सौर कृषी पंप योजना व कृषी पंप वीज जोडणीसंदर्भातील माहिती दिली. जिल्ह्यात अद्यापपर्यंत ६६८ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता मंदार बोरगे यांनी केले. आभार मुकुंद आंबी यांनी मानले.हे ठरले लाभार्थीकिरण लाडगावकर (मौजे कोडोली ता.पन्हाळा), मानसिंग सुर्वे (मौजे नरंदे ता. हातकणंगले), अण्णाप्पा केष्ते (मौजे कवठे गुलंद, ता.शिरोळ), कृष्णात कदम (मौजे जांभळी, ता.शिरोळ)