शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती

By admin | Published: July 25, 2016 10:38 PM

३० हजार १४९ लोकवस्ती : ५३ कोटी ४८ लाखांचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार, मंजुरीसाठी शासनाला सादर

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, यांचा तांडा वस्तीमध्ये समावेश करीत वसंतराव नाईक तांडावस्ती बृहत् आराखडा तयार केला आहे. या सर्व्हेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्त्या आढळल्या आहेत. ३० हजार १४९ एवढी लोकवस्ती आहे. या सर्व तांडा वस्त्यांच्या मूलभूत विकासासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपयांचा निधी लागणार आहे.हा आराखडा मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील धनगर, नाथ गोसावी, भोई, कातकरी, बेलदार या विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचा तांडा वस्तीसाठी सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेअंती वसंतराव नाईक तांडा वस्ती या नावाने २०१५-१६ ते २०२०-२१ या पाच वर्षासाठी विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व्हे करण्यात आलेल्या वस्त्यांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण, नवीन पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, दिवाबत्ती सुविधा, स्मशानशेड, वाडीअंतर्गत रस्ते, विंधनविहीर खोदणे, संरक्षक भिंत आदी प्राथमिक व मुलभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. गेले वर्षभर सर्व्हे व आराखड्याचे काम सुरू होते. मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पुणे येथील विमुक्त जाती, भटक्या जमाती संचालक यांना हा आराखडा मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. वैभववाडीला सर्वाधिक १८ कोटी ९३ लाखांची गरजपुढील पाच वर्षांसाठी करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपये निधीची गरज आहे. यात सर्वाधिक निधी वैभववाडी तालुक्याला १८ कोटी ९३ लाख ३० हजार रूपयांची गरज आहे. मालवण २ कोटी २५ लाख ५० हजार रूपये, वेंगुर्ले १ कोेटी ६१ लाख रूपये, सावंतवाडी ६ कोटी ९३ लाख ७३ हजार रूपये, देवगड ६ कोटी ७० लाख ६२ हजार रूपये, कुडाळ १० कोटी ५९ लाख रूपये, कणकवली ४ कोटी १२ लाख रूपये, दोडामार्ग २ कोेटी ३३ लाख रूपये या प्रमाणे तालुकानिहाय तांडा वस्त्यांना विकासासाठी निधीची गरज आहे. आतापर्यंत १२ कोटी १४ लाखांचा निधी खर्चया २४९ तांडा वस्त्यांमध्ये विविध योजनांतर्गत आतापर्यंत १२ कोटी १४ लाख ३६ हजार ६३९ रूपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. यात मालवण ६७ कोटी ३८ हजार १३२ रूपये, वैभववाडी ५५ लाख ८० हजार रूपये, वेंगुर्ले २५ लाख ७४ हजार, सावंतवाडी ९ कोटी ४० लाख ३७ हजार ५७५ रूपये, देवगड ४६ लाख ४७ हजार ६२१ रूपये, कुुडाळ २९ लाख ५९ हजार ३११ रूपये, कणकवली ४९ लाख रूपये असा प्रत्येक तालुक्यात खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कुडाळमध्ये सर्वाधिक तांडावस्तीजिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५० ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती आहे. देवगड ४२ ग्रामपंचायती, सावंतवाडी ३६, कणकवली ३४, मालवण ३०, वैभववाडी २७, दोडामार्ग २२ व वेंगुर्ले ८ या प्रमाणे तालुकानिहाय ग्रामपंचायतमध्ये तांडा वस्ती आढळली आहे. तसेच मालवण ३७०७, वैभववाडी २७०८, वेंगुर्ले २४३, सावंतवाडी ६५५०, देवगड ६११२, कुडाळ ५५१०, कणकवली ३५३५, दोडामार्ग १७८४ एवढी प्रत्येक तालुक्यात तांडावस्ती आहे.