शिवाजी विद्यापीठ (राजेंद्र नगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांची पालकमंत्री सतेज पाटील आणि सकल मराठा समाजातील समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आदींनी सोमवारी पाहणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संबंधित चारही जागांची तांत्रिक माहिती संकलित केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पहिल्यांदा राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील जागेची पाहणी केली. या जागांची त्यांनी प्राथमिक स्वरूपातील माहिती जाणून घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, करवीर तहसीलदार कार्यालयातील अस्लम शेख, राजाराम महाविद्यालयातील डॉ. प्रवीण कोडोलीकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, या जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील एक जागा शनिवारी (दि. २६) खासदार संभाजीराजे, आदींनी पाहणी केल्यानंतर निश्चित होणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
चौकट
राजर्षी शाहू मिलच्या जागेवर उपकेंद्र व्हावे
शहरातील राजर्षी छत्रपती शाहू मिलची २८ एकर जागा रिकामी आहे. त्याठिकाणी ‘सारथी’ संस्थेचे उपकेंद्र व्हावे. या जागेत उपकेंद्राबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कृषी केंद्र करावे, अशी मागणी मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने ऋतुराज माने, राजवर्धन बिरंजे आदींनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.
फोटो (२३०६२०२१-कोल-सारथी उपकेंद्र पाहणी) : कोल्हापुरात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्रासाठी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची पाहणी केली.
===Photopath===
230621\23kol_3_23062021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०६२०२१-कोल-सारथी उपकेंद्र पाहणी) : कोल्हापुरात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्रासाठी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची पाहणी केली.