म्हासुर्ली : जिल्हाधिकारी दौलत देसाई येत्या दोन ते तीन दिवसांत ते धामणी खोºयात येऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असे कृती समितीने आज, गुरुवारी स्पष्ट केले. यावेळी समितीने रखडलेले प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासनाची मागणी केली. ती यावेळी मान्य करण्यात आली.धामणीवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृती समिती आणि प्रशासन यांच्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय धामणीवासीयांना विचारात घेऊन घेणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी दौलत देसाई हे स्वत: धामणी खोºयातील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन करणार आहेत.मात्र, गेले दोन ते अडीच महिने धामणीवासीयांचा हा बहिष्कार प्रशासनाने बेदखल केला होता. मात्र, धामणीवासीय आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर प्रशासनाला दखल घेणे भाग पडले आणि त्यातूनच गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बहिष्काराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन करून यातील फायदे-तोटे समजून सांगितले. यावेळी कृती समितीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याबाबत मागणी केली. ती प्रशासनाच्यावतीने मान्य करण्यात आली आहे. या बाबतची चर्चा सकारात्मक झाली असली तरी कृती समितीच्यावतीने याबाबतीत जिल्हाधिकारी देसाई यांनी आपली भूमिका धामणी खोºयात येऊन स्पष्ट करावी, अशी विनंती केली. ही विनंती जिल्हाधिकारी देसाई यांनी मान्य केली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत ते धामणी खोºयात येऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.यावेळी चर्चेसाठी प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह सचिन इथापे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, तसेच पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, सीआयडीच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी धामणी खोऱ्यात संवाद साधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:40 AM