शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

जिल्हा बॅँक निवडणुकीत ‘कोटींची’ उड्डाणे ?

By admin | Published: April 27, 2015 11:33 PM

घोडेबाजाराला वेग; अफवांना उधाण

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक संचालक मंडळाच्या ५ मे २०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल व शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलमध्ये जोरदार चुरस आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घोडेबाजारालाही ऊत आला असून, मतांसाठी कोटींची उड्डाणे सुरू असल्याच्या चर्चेने खळबळ माजली आहे. दोन्ही पॅनेल्सनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चर्चा, अफवांनाही उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बॅँक राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या वर्चस्वाखाली आहे. आठ वर्षांपूर्वी ही बॅँक डबघाईला आली होती. त्यावेळी जी निवडणूक झाली त्यात राजकीय नाट्य घडून डॉ. तानाजी चोरगे हे बॅँकेचे चेअरमन झाले. मात्र त्यानंतरच्या आठ वर्षांच्या काळात तोट्यातील बॅँकेला पुन्हा रूळावर आणण्यात व फायद्यात आणण्यात डॉ. चोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आल्याचा व ही बॅँक पुन्हा सुरळीत चालविण्यासाठी सहकार पॅनेलचीच आवश्यकता असल्याचे मुद्दे सहकारतर्फे प्रचारात हिरीरिने मांडले जात आहेत. त्याचवेळी बँकेतील भरतीमध्ये झालेला गैरव्यवहार आणि त्याबाबत रमेश कदम यांनी केलेले आरोप याचे भांडवल करून शिवसेना मैदानात उतरली आहे.ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ होती. परंतु जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखताना सहकार क्षेत्रावरही आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटविण्याचा चंग बांधला आहे. कोटीची आॅफर?जिल्हा बॅँक निवडणुकीत अटीतटीचा सामना असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. मतदार आपल्यालाच मतदान करणार की नाही, यासाठी उलट तपासणीही सुरू झाली आहे. काही मतदार आपल्याला दुसऱ्या गटाकडून कोटीची आॅफर असल्याच्या अफवा पिकवून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे घोडेबाजार तेजीत असल्याची चर्चा आहे. घडी विस्कटू नका : चोरगेजिल्हा बँक आपण गेल्या आठ वर्षांच्या काळात चांगल्या स्थितीत आणून ठेवली आहे. आता या बॅँकेत नवीन करण्याजोगे फारसे काहीच नाही. मात्र बसलेली घडी तशीच राखण्यासाठी आम्ही मतदारांसमोर पुन्हा जात आहोेत. चुकीच्या हाती बॅँक जाऊन बसलेली घडी विस्कटू नये, हीच आमची इच्छा आहे, असे मत बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले.