शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

Kolhapur: आपत्ती प्रवण गावातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात राहा - प्रांताधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 4:05 PM

'ग्रामस्थांना अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेईल' 

आयुब मुल्लाखोची: आम्ही पगार घेतोय. आमचं कर्तव्य पार पाडावेच लागेल. आपत्ती प्रवण गावात काम करणाऱ्या तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी गावात राहिलेच पाहीजे. कसलीही हयगय करून चालणार नाही अशा कडक सूचना प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांनी दिल्या. ग्रामस्थांना अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.भेंडवडे, खोची येथे संभाव्य पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेत संवाद साधला. भेंडवडे लाटवडे रोडवरील पुलाजवळ आलेल्या पाण्याची तसेच प्राथमिक शाळेची पाहणी केली. खोची येथे प्राथमिक शाळेत बैठक घेत सूचना केल्या. यावेळी भेंडवडे येथील ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र याची दुरावस्था ग्रामपंचायत सदस्य यांनी लक्षात आणून दिली. यावर लवकर हा प्रश्न सोडविला जाईल असेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.तहसीलदार कल्पना ढवळे म्हणाल्या, प्रशासन सज्ज असून महसूल विभागाने गत वेळेच्या महापुराचा अभ्यास करून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांची राहण्याची व्यवस्था, जनावरांची शेडची व्यवस्था या अनुषंगाने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रवींद्र जंगम, तलाठी प्रवीण तोडकर, ग्रामविकास अधिकारी डी.आर.देवकाते, उत्तम पाटील तसेच खोची येथे सरपंच अभिजित चव्हाण, तलाठी प्रमोद पाटील, उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर