शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Diwali : दीपोत्सव पर्वाला प्रारंभ, अभ्यंगस्नानाने सुरुवात, कोल्हापूर बाजारपेठेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:00 PM

धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल्हापूर फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत जागून सणाच्या स्वागताची लगबग सुरू होती.

ठळक मुद्देदीपोत्सव पर्वाला प्रारंभ, अभ्यंगस्नानाने सुरुवात कोल्हापूर बाजारपेठेला उधाण

कोल्हापूर : धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल्हापूर फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत जागून सणाच्या स्वागताची लगबग सुरू होती.दिवाळी म्हणजे आकाशकंदिलाचा झगमगाट, पणत्यांचे तेज, चटपटीत फराळ, फटाक्यांची आतषबाजी, गोधन पूजन, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा या सहा दिवसांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. वसू बारस हा दिवस शेतकरी बांधवांकडून तर धनत्रयोदशी हा दिवस विशेषत: वैद्यकीय क्षेत्राकडून साजरा केला जातो. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते ती नरकचर्तुदशीच्या अभ्यंगस्नानाने.

गेल्या वर्षभरापासून ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते, ठेवणीतल्या साड्या, पैठणीची घडी मोडते, अनेक अनुभवांनी सुरकुतलेल्या वृद्धांपासून ते निरागस लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यांवर हसू उमटते. आप्तेष्टांच्या भेटीने प्रेमळ आठवणींची उजळणी होत नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट होते त्या दिवाळी पहाटेच्या तयारीची अपूर्वाई घरोघरी सुरू आहे.धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या प्रकाशाच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी आता रांगोळी सजू लागली आहे. आकाशकंदीलाच्या प्रकाशाने घरदार उजळून निघालंय. लहानग्या हातांनी घडवलेल्या किल्ल्यांवर आता शिवाजी महाराज, मावळे, गावकऱ्यांचे आगमन झाले आहे समोर मिणमिणत्या प्रकाशात किल्ल्याला अधिक सौंदर्य आले.

विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, शोभेचे आकाशकंदील, रंगरंगोटी, साफसफाईने घराचा कायापालटच झाला आहे. एक दिवसावर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू होती. बेसन-कळीचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा असा स्वादिष्ट फराळ बनविल्यानंतर महिलांनी घराची साफसफाई करून घर अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी, सुरेख सजावटी करून आपले कौशल्य पणाला लावले आहे.  

पुरुष मंडळींनी आकाशकंदील, विद्युतमाळा लावत आपल्या दारात अधिकाधिक प्रकाश कसा पडेल, घराचे बाह्य रूप कसे खुलून दिसेल यावर लक्ष केंद्रित केले. बच्चेकंपनीचा उत्साह ओसंडून वाहत आहे तर ज्येष्ठांचा अनुभव सगळ्यांनाच कामी येत आहे. कुटुंबातल्या आबालवृद्धांचे हात आता कामात गुंतले आहेत.

आकाशकंदील...विद्युत रोषणाईधनत्रयोदशीपासून दारात दिवे लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे दारात लावलेल्या पणत्यांचा मंद प्रकाश दिवाळीचा आनंद घेऊन आला आहे. आकाशकंदील, विद्यत रोषणाई आणि पणत्यांच्या प्रकाशाने अवघे कोल्हापूर प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाले आहे.बाजारपेठेला उधाणवर्षातला सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला भिशी, रिकरिंग, ठेव अशा बचतीतून मिळालेले पैसे खर्च केले जातात. ही बचत कुटुंबीयांसाठी खर्च करत कोल्हापूरकरांनी खरेदीचा आनंद लुटला. सणाला एक दिवस राहिलेला असताना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड आणि लक्ष्मीपुरी येथे नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण येऊन प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होत होते. 

उटणे, साबण, पूजा साहित्यांची खरेदीनरकचर्तुदशीला उटणे आणि सुवासिक तेलाने अभ्यंगस्नान केले जाते.  या अभ्यंगासाठी उटणे, तेल, साबणासह अत्तर, डिओ, सेंट अशा सुवासिक साहित्यांची खरेदी केली जात होती. तर बुधवारी लक्ष्मीपूजन असल्याने लक्ष्मी कुबेराचे फोटो, लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले, पान, सुपारी, वस्त्रमाळ, धने, पाच फळे, केळी, धूप, कापूर, सुवासिक अगरबत्ती, अशा पूजेच्या साहित्यांची महापालिका चौक जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे खरेदी केली जात होती. झेंडू ३० रुपये पावकिलो, पाच फळे ४० रुपयांना तर धूप, अगरबत्तीची त्यांचा सुगंधावरून किंमत आकारली जात होती. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर