कोल्हापूर : परदेशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातदिवाळी साजरी केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातर्फे हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीविषयक माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.विद्यापीठाच्या अतिथिगृहात आकाशकंदील व दीप प्रज्वलित करून दिवाळीच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी भारतीय संस्कृतीतील दिवाळीचे महत्त्व, रूढी-परंपरा, रीतिरिवाज, आदींची माहिती दिली. त्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. डी. के. गायकवाड, मेघा पानसरे, के. डी. सोनवणे, एन. जे. बनसोडे उपस्थित होते. इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक डॉ. ए. व्ही. घुले यांनी स्वागत केले. इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेलचे रेक्टर डॉ. बी. यादव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.