कोल्हापूर : दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक, तर शहरातील माध्यमिक शाळा सोमवारी सुरू झाल्या. विविध खेळांमध्ये विद्यार्थी रमले, तर शाळांचा परिसर गजबजून गेला.दिवाळीची सुटी दि. ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तर शहरातील माध्यमिक शाळा सुरू झाल्या. सुटीनंतरच्या पहिल्या दिवशी सकाळी शिक्षकांनी सहामाही परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची त्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांना त्यांचे पेपरही दाखविण्यात आले. त्यानंतर सुटी त केलेला अभ्यास शिक्षकांनी तपासला. दुपारनंतर विद्यार्थी शाळेमध्ये रमले. शाळेच्या परिसरात क्रिकेट, पकडापकडी, लपाछपी, असे विविध खेळ रंगले होते. काही विद्यार्थी-विद्यार्थीनी सुटीमध्ये केलेली धमाल एकमेकांना सांगत होते. त्यातच विद्यार्थ्यांच्या शाळेतचा पहिला दिवस सरला. काही विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली. दरम्यान, बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर नेण्यासाठी पालक आले होते.महानगरपालिकेच्या शाळा गुरूवारपासून भरणारमहानगरपालिकेच्या आणि खाजगी प्राथमिक शाळा गुरूवार (दि. २२) पासून भरणार आहेत. त्याची तयारी शिक्षकांकडून सुरू आहे. या शाळांनी जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा दोन सुट्या जादा घेतल्या आहेत.