शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

Diwali : नव्याच्या ‘आपुलकी’ला जुन्याच्या ‘माणुसकी’चा गहिवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 4:57 PM

आजवर विविध आंदोलने, सभा, मोर्चांनी तुडुंब भरून वाहणाऱ्या ‘सीपीआर’- दसरा चौकाने माणुसकीने ओथंबलेल्या दातृत्वातून आपुलकीचा गहिवर अनुभवला. ‘सीपीआर’ चौकातील माणुसकीच्या भिंतीवरून जुने कपडे, तर दसरा चौकातील आपुलकीच्या भिंतीवरून नवे कपडे घेण्यासाठी गरजूंची झुंबड उडाली.

ठळक मुद्देनव्याच्या ‘आपुलकी’ला जुन्याच्या ‘माणुसकी’चा गहिवरदोन्ही उपक्रमांना उदंड प्रतिसाद : कपडे घेण्यासाठी गरजूंची झुंबड

कोल्हापूर : आजवर विविध आंदोलने, सभा, मोर्चांनी तुडुंब भरून वाहणाऱ्या ‘सीपीआर’- दसरा चौकाने माणुसकीने ओथंबलेल्या दातृत्वातून आपुलकीचा गहिवर अनुभवला. ‘सीपीआर’ चौकातील माणुसकीच्या भिंतीवरून जुने कपडे, तर दसरा चौकातील आपुलकीच्या भिंतीवरून नवे कपडे घेण्यासाठी गरजूंची झुंबड उडाली.

मिळतंय म्हणून ढीगभर कपडे घेण्याची हपापलेली प्रवृत्तीही तेथे दिसली, तरी देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी याचेही प्रत्यंतर जुने कपडे मोठ्या प्रमाणावर आणून देणाऱ्याकडे पाहून आली. या दोन्ही उपक्रमांमुळे गरजूंची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. नवे आणि हवे ते कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

‘सीपीआर’ चौकात जुन्यांची ‘माणुसकी’नको असेल ते द्या आणि हवं ते घेऊन जा, हे ब्रीद घेऊन सलग तिसऱ्या वर्षी ‘सीपीआर’ चौकात ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महापौर शोभा बोंद्रे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, उपमहापौर महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.‘सीपीआर’ चौकात उभारलेल्या मंडपात पहिल्याच दिवशी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच जुनी कपडे आणून देण्यासाठी आणि या कपड्यातून हवे ते घेऊन जाण्यासाठी गरजूंनी गर्दी केली होती. स्वत: आमदार सतेज पाटील यांनी गरजूंना कपडे वाटप केले. कपडे संकलनाचा ओघ दिवसभर सुरूच होता. स्वच्छ धुऊन, इस्त्री करून, पिशव्या भरभरून कपडे आणून दिले जात होते.या कपड्यांचे संयोजकांकडून वर्गीकरण करून मागणीप्रमाणे वाटप केले जात होते. रस्त्यावरील फिरस्ते, कामगार, झोपडपट्टीतील महिला व मुलांची कपडे घेण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रत्येकजण आपल्याला लागेल तेवढे कपडे घेत होता. गर्दी वाढल्याने शहरातील झोपडपट्टी, ऊस तोडणी मजुरांसह गरजू असणाऱ्या भागात थेट नेऊन देण्यासाठी टेम्पो भरून रवाना करण्यास सुरुवात झाली. सायंकाळी महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी या उपक्रमाला भेट देऊन निवारा केंद्रात राहणाऱ्यांना कपडे वाटप केले.यावर्षी कपडे संकलनाचा ओघ वाढला आहे; त्यामुळे दोन दिवसांत जे कपडे शिल्लक राहतील, त्याच्या गोधड्या तयार करून त्या फिरस्त्यांना देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. अन्य कपड्यांपासून पिशव्या तयार करून त्यांचे वाटप लवकरच हाती घेतले जाणार आहे.या उपक्रमात गणी आजरेकर, शारंगधर देशमुख, मोहन सालपे, भरत रसाळे, सुयोग मगदूम यांच्यासह विश्वास पाटील, अमरसिंह पाटील, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रशांत पोफळे, प्रसाद पाटील, सूरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, देवेंद्र रासकर यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.

आमच्या चांगल्या उपक्रमाचे कोणी अनुकरण करत असेल, तर त्याचा आनंदच आहे. आम्ही सुरू केलेली माणुसकीची भिंत आज मुंबई, इचलकरंजी, कागल येथेही सुरू आहे. वाढता प्रतिसाद पाहून दरवर्षी हा उपक्रम याच नेटाने सुरू ठेवणार आहोत.आमदार सतेज पाटील---------------------

वीरमातेकडून कपडे दानप्रत्येकाची दिवाळी चांगली जावी म्हणून माणुसकीच्या भिंतीसाठी समाजातील सर्व घटकांतून कपडे दान होत आहेत. शुक्रवारी नाना पाटील नगरातील गयाताई कमाने या वीरमातेने आपल्या शहीद झालेल्या मुलाचे कपडे आणून दिले. त्यांचा मुलगा गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाला आहे. आपला मुलगा देशासाठी कामी आला, त्याच्या कपड्यांनी देशातील गरजूंचे संरक्षण करावे, या हेतूने या वीरमातेने आपल्या लाडक्या मुलाचे कपडे दिले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी हात जोडून या वीरमातेच्या दातृत्वाचे कौतुक केले. यावेळी उपस्थितांचाही ऊर भरून आला.

गोव्यातून कपडेगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी कपड्यांचे चार मोठे बंडल कुरिअरद्वारे ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमासाठी पाठवले आहेत. कोल्हापुरातील अ‍ॅड. प्रिया गळदगे यांचे पती विमानतळावर कार्यरत आहेत. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून त्यांनी हे कपडे पाठवले आहेत.

दसरा चौकात नव्याची ‘आपुलकी’‘एक नातं आपल्या माणसासाठी’ हे ब्रीद घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्यातर्फे यावर्षीपासून दसरा चौकात ‘आपुलकीची भिंत’ उभी करण्यात आली. गोरगरिबांची ही दिवाळी नव्या कपड्यांनी साजरी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. नवे कोरे कपडे घेण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.खासदार महाडिक यांनी स्वत: उपस्थित राहून गरजूंना नव्या कपड्यांचे वाटप केले. याचे उद्घाटन आमदार अमल महाडिक, भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, कचरावेचक संघटनेच्या आक्काताई गोसावी, ‘सीपीआर’ चतुर्थश्रेणी कामगार संघटनेच्या राणी घावरी, चुनाभट्टीवर काम करणाऱ्या हिराबाई बालनकर, ‘सीपीआर’ हंगामी कर्मचारी लता माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दसरा चौकातील मैदानावर मांडव उभारून तेथे सकाळी दहा वाजल्यापासून नव्या कपड्यांचे वाटप सुरू करण्यात आले.साड्या, चुडीदार, शर्ट, पँट असे नवे कोरे कपडे मिळू लागल्याने गर्दीचा ओघ वाढला. दुपारी १२ वाजेपर्यंत बहुतांश सर्व कपडे संपले, तरीही गर्दी हटत नव्हती. झोपडपट्टी वसाहतीमधून महिलांचे तांडेच्या तांडे दसरा चौकात येत होते. टेम्पो भरून, रिक्षाने येऊन महिला मोठ्या प्रमाणावर कपडे घेऊन जात होत्या. तीन तासांत १० हजार कपड्यांचे वाटप पूर्ण झाले. कपडे संपले आहेत, असे संयोजकांना सांगावे लागले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने महाडिक ग्रुपतर्फे आज, शनिवारी झोपडपट्टीत फराळाचे वाटप केले जाणार आहे, असे संयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले.यावेळी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, महापालिका विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, नगरसेवक राजसिंह शेळके, भाग्यश्री शेटके, उमा इंगळे, किरण नकाते, मेहजबीन सुभेदार, ईश्वर परमार, कमलाकर भोपळे, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, सुनंदा मोहिते, रूपाराणी निकम, सीमा कदम, स्मिता माने, आदी उपस्थित होते.

आपण दिवाळीला नवीन कपडे घालतो, मग गोरगरिबांनीच का जुने कपडे घालावेत, याचे वाईट वाटले म्हणून हा उपक्रम हाती घेतला. महाडिक उद्योग समूहातर्फे १0 हजार कपडे वाटप झाले आहेत. दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत.खासदार धनंजय महाडिक 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर