गडहिंग्लज : स्थुलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियानाचे संकल्पक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या जीवनशैलीचा लाभ गडहिंग्लज विभागातील लोकांना व्हावा. यासाठी गडहिंग्लज येथे डॉ. दीक्षित सल्ला केंद्र सुरू करण्याचा मानस आहे, अशी माहिती रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली. कुडाळ येथील डॉ. दीक्षित सल्ला केंद्राचे समन्वयक इंजि. प्रकाश चव्हाण यांच्या ’डॉ. दीक्षित जीवनशैली’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गडहिंग्लज येथील संस्थेच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. इंजि. चव्हाण यांनी डॉ. दीक्षित यांच्या 'विनासायास वेटलॉस आणि मधुमेहावर नियंत्रण' यासंबंधी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
ते म्हणाले, रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार टाळण्यासाठी दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना, आनंदी व आरोग्यदायी जीवनाची तीच गुरूकिल्ली आहे. यावेळी ‘रवळनाथ’चे संस्थापक संचालक बसाप्पा आरबोळे, संचालक महेश मजती, किरण पोतदार, उमा तोरगल्ली, नंदकुमार शेळके, विलास कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, 'झेप'च्या गौरी बेळगुद्री यांच्यासह सर्व शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात एम. एल. चौगुले यांनी मार्गदर्शन केले. शेजारी प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, दत्ता पाटील, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. क्रमांक : २७०७२०२१-गड-०३