खोची : आरोग्य, सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल डीएनएसपी कंपनीस बेस्ट कंपनी म्हणून विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे हा कार्यक्रम झाला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. आर. अन्सारी यांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनीचे संस्थापक सीएमडी अमोल निकम यांनी स्वीकारला. तसेच कंपनीचे मोटिव्हेशनल स्पिकर सुनील शिसाळे, डॉ. इम्रान शेख यांना बेस्ट युथ आयकॉन हा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या सहा वर्षांपासून कंपनीने वेगवेगळ्या दर्जेदार उत्पादनांची विक्री करीत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच सेंद्रिय शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी कंपनीने नेहमीच प्राधान्याने काम केले आहे, असे अमोल निकम यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यास राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. हाजी एल. ए. एस. दामा, राज्य अध्यक्ष सय्यद लाइक आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने बेस्ट कंपनी पुरस्कार डॉ. एम. आर.अन्सारी यांच्या हस्ते डीएनएसपी कंपनीचे सीएमडी अमोल निकम यांनी स्वीकारला. यावेळी डॉ. हाजी एलएएस दामा, सय्यद लाइक, सुनील शिसाळे, डॉ. इम्रान शेख उपस्थित होते.