कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी कोल्हापूर ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे शुक्रवारी केली.
थकीत बिलापोटी शेतकºयांच्या शेती पंपांची कनेक्शन तोडली जात आहेत; पण साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे, अद्याप शेतकºयांचा ऊस शिवारातच उभा असल्याने त्याच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे ‘महावितरण’ची थकीत रक्कम तो भरू शकलेला नाही. उसाची बिले जमा होताच थकबाकीची रक्कम भरली जाईल. त्यामुळे शेती पंपांची कनेक्शन तोडू नये, अशी मागणी काटे यांनी केली.
त्याचबरोबर विद्युत वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळले आहेत. त्याची नुकसानभरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही. संबंधित शेतकºयांना नुकसानभरपाई त्वरीत द्यावी, असेही त्यांनी सोनवणे यांना सांगितले. या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू, असा इशाराही काटे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे, आप्पाराजे खर्डेकर, सचिन शिंदे, रमेश भोजकर, सागर चिपरगे, भीमगोंडा पाटील, सचिन मोरे, भाऊसो माळी आदी उपस्थित होते.मोफत औषधोपचार कराऊसतोड मजुरांकडे रहिवासी पुरावा नसल्याने सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले असून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करावेत, अशी मागणी काटे यांनी सीपीआर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.