पट्टणकोडोली : महावितरण कार्यालयाकडून थकीत वीज बिलाची वसुली व त्या पोटी विद्युत जोडणी ही तोडली जात आहे. याबाबत पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील संघर्ष कृती समिती यांचे वतीने आज वीज कनेक्शन तोडू नये याबाबत हुपरी उपकार्यकारी अभियंता रामेश्ववर कसबे यांना निवेदन देण्यात आले.
महावितरण कार्यालयाकडून वायरमनमार्फत थकित वीज बिलाची वसुली केली जात आहे. त्याचबरोबर प्रसंगी ग्राहकांची वीज तोडली जात आहे. त्यामुळे कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. यामुळे पट्टणकोडोली शहर संघर्ष कृती समितीच्या वतीने आज हुपरी येथील उपकार्यकारी अभीयंता कसबे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये वीज तोडणी करू नये. वीज ग्राहकांना वीज बिलाचे टप्पे करून द्यावेत, अशा विविध मागण्या केल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वीज बिल संदर्भात सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन दिले. गावातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी वीज बिल संदर्भात काही शंका असतील तरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी कृती समितीचे अध्यक्ष अन्वर जमादार, उपाध्यक्ष अनिल कांबळे, सरचिटणीस राजू आडके, शिवाजी भानसे, नंदकुमार कीर्तीकर, नंदकुमार गायकवाड, विजयकुमार स्वामी, रवी अडके, संदीप माळी, किशोर रांगोळे, विकास बिरांजे, शिवा ओमा, प्रदीप मिरजकर, जहांगीर जमादार, पट्टणकोडोली किराणा असोसिएशनचे अध्यक्ष आनंदा जाधव व श्रेनिक तेली, संदीप रांगोळे उपस्थित होते.