शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊ नका

By admin | Published: May 03, 2015 12:59 AM

संभाजी ब्रिगेड : कार्यक्रम उधळून लावू

कोल्हापूर : ज्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली व जेम्स लेनच्या पुस्तकाचे प्रचारक म्हणून ज्यांनी काम केले, अशा बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणे म्हणजे महापाप आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे शनिवारी करण्यात आली. पुरंदरे यांनी वेगवेगळ्या पुस्तकांतून मराठा-बहुजन स्त्रियांची बदनामी केली. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन तो बाटविण्याचेच काम सरकारकडून होत आहे. आमच्या पूर्वजांच्या रक्तातून हा महाराष्ट्र घडला आहे आणि इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्याला आम्ही कदापि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊ देणार नाही. तसेच पुरंदरे यांच्या विकृत लिखाणाविरोधात कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल आहे. तसेच हा पुरस्कार फक्त ब्राह्मणांसाठीच आहे का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे. आजपर्यंतचे १५ पुरस्कार ब्राह्मणांना व एकच पुरस्कार कुणबी समाजातील डॉ. विजय भटकर यांना देण्यात आला आहे. पुरंदरे यांना हा पुरस्कार देऊन सरकार एकप्रकारे शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम करीत आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की, शिवभक्तांच्या व मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून पुरंदरेंना हा पुरस्कार देऊ नये. तरीही हा पुरस्कार देण्याचा घाट घातल्यास हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष रूपेश पाटील, संघटक जितेंद्र पाडेकर, संदीप पाटील, भगवान कोईगडे, शिवाजी गुरव, दत्ता मेटील, अनिकेत सावंत, सागर गवळी, संदीप बोरगावकर, दीपक दळवी, विनोद यादव, गिरीश कदम, योगेश जगदाळे, धनाजी मोरबाळे, अजय बोभाटे, विकास जाधव, विजयकुमार पाटील, संजय यादव, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)