कोल्हापूर : राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आईवडिलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; कारण आपण या दोस्तीत गुंतलेलो असतो; परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा, यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे केले.कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड परिसरात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती होती.मंत्री रावते म्हणाले, येणारा काळ हा पुन्हा शिवसेना-भाजपचा असेल अशी स्थिती सध्या दिसत आहे; परंतु हे निव्वळ शिवसैनिकांच्या कामामुळेच शक्य आहे. प्रत्येक शिवसैनिकाने दहा घरांत प्रचार केल्यास उमेदवार निवडून येण्यास काहीच अडचण नाही.अरुण दुधवडकर म्हणाले, कोल्हापूर मतदारसंघात युतीचे विधानसभेचे व विधान परिषदेचे मिळून पाच आमदार आहेत. त्यामुळे काहीच अडचण नाही.राजेश क्षीरसागर, इंगवले अनुपस्थितशिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर व शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीबाबत मेळाव्याच्या ठिकाणी चर्चा सुरू होती
दोस्तीच्या आहारी जाऊ नका; अडचण होईल : दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 3:35 AM