शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

ब्रेस्ट कॅन्सरकडे दुर्लक्ष नको : रेश्मा पवार

By admin | Published: March 23, 2015 11:55 PM

स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांचा द्वितीय स्मृतिदिन

कोल्हापूर : तरुण महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूपच वाढले आहे. वेळीच निदान झाल्यास तो बरा होतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये, असा कानमंत्र डॉ. रेश्मा पवार यांनी दिला. लोकमत ‘सखी मंच’च्या संस्थापिका आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘सखी मंच’तर्फे सोमवारी ‘ओंजळ फुलांची’ या कार्यक्रमाचे आयोजन शाहू स्मारक भवनात केले होते. यावेळी ‘लढा ब्रेस्ट कॅन्सरशी’ या विषयावर डॉ. पवार बोलत होत्या. डॉ. पवार म्हणाल्या, लहान वयात मासिक पाळी होणे, दीर्घकाळाने होणारी अपत्ये, वय, अनुवंशिकता, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे स्तनाचा कर्करोग होतो; पण अनुवंशिकतेमुळे स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्करोगाची लक्षणे दिसताच महिलांनी उपचार घ्यावेत. यावर शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपचार आहे.स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे, उपचारपद्धती, मॅमोग्राफी, गर्भायशाचा कर्करोग व त्याची कारणे व उपचार या विषयीही डॉ. पवार यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात मधुबन निर्मित व घन:श्याम वेंगुर्लेकर प्रस्तुत ‘भजन संध्या’ या कार्यक्रमात घन:श्याम वेंगुर्लेकर, रणजित बुगले, विजय कुलकर्णी, वैदही जाधव यांनी भजने सादर केली. यावेळी ‘ओंकार स्वरूपा...’, ‘उठी-उठी गोपाळा...’, ‘देह देवाचे मंदिर...’ आदी गीतरचना वेंगुर्लेकर आणि सहकलाकारांनी सादर केल्या. वर्षा गाडगीळ यांनी निवेदक म्हणून काम पाहिले. डॉ. रेश्मा पवार आणि घन:श्याम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संयोजिका प्रिया दंडगे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)