लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला ‘जी.आय.’ मानांकनास मान्यता मिळून तीन वर्षे झाली, प्रत्येक बैठकीत त्याचीच माहिती सांगितली जाते. लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या ‘जी. आय’ मानांकनाच्या अंमलबजावणीचे बोला, अशा शब्दांत गूळ उत्पादक शेतकºयांनी बाजार समिती प्रशासनाला सुनावले. बॉक्समधील गुळाच्या वजनाच्या माध्यमातून व्यापारी राजरोसपणे लूट करत असल्याचे आरोपही यावेळी शेतकºयांनी केले.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बुधवारी गूळ उत्पादक, गूळवे, व्यापाºयांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये दीड तास केवळ गूळनिर्मिती यावरच चर्चा झाल्याने शेतकरी संतप्त झाले. अध्यक्षस्थानी सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर होते. उसाच्या वाणापासून गूळ निर्मितीपर्यंत शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रा. डॉ. अरुण मराठे यांनी माहिती दिली.बाजार समितीला ‘जी.आय.’ मानांकन मिळाले असून त्याचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले. मानांकनाबाबत समितीने माहिती देण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी कधी करणार ते सांगावे, असे आवाहन करत कोणत्या गुणवत्तेचा गूळ तयार केला पाहिजे, त्यासाठी दराची हमी तुम्ही घेणार का? अशी विचारणा बाळासाहेब पाटील (वंदूर) यांनी केली. मानांकनाबाबत ही चौथी बैठक आहे, केवळ चर्चा करू नका, त्याच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय घ्या, असे तानाजी आंग्रे (वरणगे) यांनी सांगितले. मानांकनानुसार गूळ तयार केला तर त्याचे वेगळे सौदे काढले जातील, असे भगवान काटे यांनी सांगितले. त्यावर संतप्त होत, गुळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी तुमच्याकडे प्रयोगशाळा आहे का? अशी विचारणा आंग्रे यांनी केली.बॉक्समधील गुळाच्या वजनात व्यापारी ७००-८०० ग्रॅमची तूट धरत असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे दादासो पाटील (निगवे दुमाला) यांनी निदर्शनास आणून दिले. उपसभापती आशालता पाटील, ‘कुंभी’चे संचालक संजय बळवंत पाटील, डॉ. एम. बी. किडगांवकर, शिवाजी पाटील, सचिव दिलीप राऊत यांच्यासह संचालक उपस्थित होते. उपसचिव मोहन सालपे यांनी प्रास्ताविक केले.हायड्रॉस पावडरमुळे कॅन्सर!अलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात गूळ निर्मितीत हायड्रॉस पावडरचा वापर करत असल्याचे सांगत त्याचा वापर कमी करण्याचे आवाहन प्रा. मराठे यांनी केले. हा गूळ खाऊन गुजरातमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.ब्राझील गुळाची ध्वनिचित्रफीतब्राझीलमधील उसाची शेती व गूळ व्यवसायाची ध्वनिचित्रफीत सादर केली. याप्रमाणे येथील दहा-पंधरा शेतकºयांनी एकत्रित येऊन व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.व्यापाºयांची दांडी!गूळ हंगामापूर्वी अडीअडचणी सोडवण्याबरोबरच ‘जी. आय.’ मानांकनाची अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. पहिल्यांदाच शेतकºयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पण व्यापाºयांनी दांडी मारल्याने अनेक प्रश्न गुलदस्त्यातच राहिले.
‘जी.आय.’ची माहिती नको; अंमलबजावणीचे बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:08 AM