कोल्हापूर : ‘दोन नंबरवाले’ अशी ख्याती असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या कारभारावर आमदार पाटील यांनी टीका केल्यावर त्यास महाडिक यांनी नैतिकता नसणाºयांनी ‘गोकुळ’वर बोलू नये, अशी टीका केली होती. त्यास पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. महाडिक यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘गोकुळ हा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकºयांच्या कष्टावर नावारूपाला आला आहे. संघातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच माझा लढा सुरू आहे; पण मी ज्या-ज्यावेळी तेथील भ्रष्टाचारावर बोलतो, त्यावेळी संघाचे जनसंपर्क अधिकारी असल्याप्रमाणे महादेवराव महाडिक नेहमीच्या डायलॉगबाजीच्या स्टाईलने खुलासा करतात व मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करतात. ‘गोकुळ’ म्हणजे महाडिकांना खासगी मालमत्ता वाटते. ज्यांची ओळखच ‘दोन नंबरवाले’ अशी आहे, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. संघातील लोणी लाटणाºया महाडिकरूपी बोक्याला शेतकºयांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. परजिल्'ांतून आलेल्या महाडिक यांनी गोकुळ व राजाराम कारखान्यांच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती मिळवली आहे.’
गाईच्या दुधात २ रुपये कपात करून ‘गोकुळ’ने उत्पादकांना अडचणीत आणले आहे. याचा जाब आम्ही संचालकांना विचारला. मात्र त्यांनी गुळमुळीत उत्तरे देऊन वेळ मारून नेली. आमच्या आंदोलनाचा धसका घेऊनच अमल महाडिक व राजन शिंदे यांनी शिरोलीच्या पेट्रोल पंपात खासगी दूध संघ मालकांची बैठक घेऊन दूधदरातील कपात कायम ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ‘गोकुळ’ आपल्या ताब्यात राहावा यासाठीच महाडिक कंपनीची केविलवाणी धडपड सुरू आहे; परंतु लोक त्यांना संघातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.