गडहिंग्लज : देशात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रचंड संधी उपलब्ध आहे. ही संधी मिळविण्यासाठी केवळ पदवीवर अवलंबून न राहता कौशल्य वाढवा, असे सल्ला जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. एस. एच. सावंत यांनी दिला.महागाव (ता. गडहिंग्लज) येथे संत गजानन महाराज कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित ‘नवप्रवर्त्य २०१५’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संत गजानन शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण होते. प्रा. आर. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील तांत्रिक व व्यावहारिक ज्ञान मिळविण्याबरोबरच ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नये. प्राचार्य संजय दाभोळे म्हणाले, देशात दरवर्षी लाखो अभियंते तयार होतात. मात्र, त्यापैकी नोकऱ्या देण्यायोग्य २५ टक्के असतात. कौशल्याअभावी अन्य विद्यार्थी मागे पडतात. कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना प्रचंड संधी उपलब्ध आहेत. प्रा. पाटील यांचेही भाषण झाले.यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, रजिस्ट्रार प्रा. शिरीष गणाचार्य, विभागप्रमुख राजेंद्र तेलवेकर, प्राचार्य डॉ. राजशेखर चिमकोडे आदींसह विभागप्रमुख शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. प्रशांत पालकर यांनी स्वागत केले. प्राचार्य संजय दाभोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. चंद्रशेखर रूडगी यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य डॉ. सरिता शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)संस्थापकांकडून ५ हजार !सिव्हील विभागाच्या विद्यार्थ्यांनी कागदी लगद्दीपासून बनविलेले संस्थेच्या इको फे्रं डली लोगोचे अनावरण संस्थापक अॅड. चव्हाण यांच्याहस्ते झाले. विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ५ हजारांचे बक्षीस त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.११०० विद्यार्थ्यांचा सहभागप्रकल्प व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील सुमारे ११०० स्पर्धकांनी भाग घेतला. त्यांचा प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देवून गौरव झाला.
केवळ पदव्या नकोत
By admin | Published: March 23, 2015 11:13 PM