आजरा : आजरा साखर कारखान्यात गतवर्षी गाळप झालेल्या उसाची सर्व बीले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. ४५ रुपयांप्रमाणे बिले मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. चालूवर्षी डिस्टिलरी प्रकल्प उभारणे, ऊस विकास कार्यक्रमाद्वारे ऊस उत्पादन वाढविणे, यासह विविध महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. सभासदांनो, काळजी करू नका, फक्त विश्वास द्या. हमारे पास बहुत पैसा है...कारखान्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशा शब्दांत अध्यक्ष अशोक चराटी यांनी कारखान्याचा ताळेबंद मांडला.आजरा साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संचालक मारुती घोरपडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी नोटीस वाचन केले.चराटी म्हणाले, कारखाना मशिनरी ओव्हरोलिंगचे काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या शेअर्स रक्कम वाढविण्याबाबतच्या आदेशानुसार भागधारकास दहा हजार रुपयांचे भाग खरेदी करावे लागतील. सर्व संचालक डिस्टिलरी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक ऊस वाढीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येत आहे.सभेमध्ये हरिबा कांबळे, तुळसाप्पा पोवार, आनंदा पाटील यांनी विविध प्रश्न विचारले. संचालक विष्णुपंत केसरकर, अध्यक्ष चराटी, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी उत्तरे दिली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव व्यंकटेश ज्योती यांनी केले. संचालक दिगंबर देसाई यांनी आभार मानले.सभेस अजित चराटी, बापूसाहेब सरदेसाई, डॉ. अनिल देशपांडे, रमेश रेडेकर, उपसभापती दीपक देसाई, विजयकुमार पाटील, बाबूराव कुंभार, विश्वासराव देसाई, मारुती मोरे, रमेश रेडेकर, राजू होलम, राजू पोतनीस यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)सभेतील प्रमुख ठरावसभेमध्ये तानाजी देसाई यांनी केंद्र सरकारने साखर साठ्यावर केलेले निर्बंध काढून टाकावेत हा ठराव मांडला. प्रा. टी. एम. राजाराम यांनी कारखान्यातर्फे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा ठराव, तर संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव पांडुरंग लोंढे यांनी मानला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.क्रांती मोर्चास सर्व सहकार्य : चराटीकोल्हापूर येथे मराठा समाजाच्या १५ आॅक्टोबरला होणाऱ्या क्रांती मोर्चास कारखान्याचे ५०० कर्मचारी पाठविण्यात येतील. लागेल ते सर्व सहकार्य राहील, असे चराटी यांनी सांगितले.
काळजी करू नका..फक्त विश्वास द्या
By admin | Published: September 26, 2016 11:51 PM