शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

निवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ?: अमल महाडिक यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:56 PM

बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ? अमल महाडिक यांचा सवाल

कोल्हापूर : बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.निवेदनात म्हटले आहे, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये बैठक घेऊन पाचगावसाठी पाच कोटी तीन लाख रुपये मंजूर करून आणले. त्यातून शिक्षक कॉलनीत साडेतीन लाख लिटरची पाणी टाकी उभी केली. उजळाईवाडीतून चित्रनगरीला आणि तिथून पाचगावला नव्या पाईपलाईनद्वारे पाणी नेले. २६ जानेवारी २०१६ पासून पाचगावला रोज १४ लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. याव्यतिरिक्त ज्या कॉलनी आणि वस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि नियोजन समितीमधून काम मंजूर झाले आहे.खास बाब म्हणून टंचाई निधीतून दहा कोटी ५३ लाख रुपये मंजूर करून घेतले असून, यातून गळकी पाईप बदलणे, जलशुद्धिकरण, पंप बदलणे ही कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले असून, यातून गांधीनगरजवळील १३ गावे आणि नवीन ७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.या सर्व परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असताना नंदगावमधून पाणी आणण्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची कुणकुण लागल्यानेच श्रेय घेण्यासाठी ही संबंधितांची धडपड असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाचगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी आणि माझे शासन बांधील आहे. केवळ पाचगावसाठी १६०० मीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. मात्र, ही कामे आपण मंजूर केल्याचे भासवून श्रेय लाटण्याचा उद्योग बंद करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

तुमचे कर्तृत्व माहिती आहेपाचगाव, गांधीनगरच्या पाणी योजनांसाठी काय केले याची माहिती देताना आमदार अमल महाडिक यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. आयआरबी प्रकल्प आणि अपुरी थेट पाईपलाईन योजना हे तुमचे कर्तृत्व सर्वांना माहिती आहे, असे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amal Mahadikअमल महाडिकkolhapurकोल्हापूर