शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

डॉक्टरला मारहाण; तिघे अटकेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 12:40 AM

माजी नगरसेवकाचा समावेश; रुग्णालयाचे बिल कमी करण्यावरून घटना

कोल्हापूर : उद्यमनगर येथील लक्ष्मीनारायण जनसेवा या विश्वस्त संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या पंत वालावलकर रुग्णालयाच्या डॉक्टरला बिल कमी करण्याच्या वादातून माजी नगरसेवकासह तिघांनी कानशिलात लगावत मारहाण केली. डॉ. याकूबखान नजरखान पठाण (वय ३८, रा. कागल) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी डॉक्टर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित माजी नगरसेवक रफिक निसार मुल्ला (४५) त्याचे साथीदार मयूर दत्तात्रय पाटील (३०), हसन रफिक शेख (२८, सर्व रा. यादवनगर) यांना अटक केली. अधिक माहिती अशी, विश्वनाथ ज्ञानू काकडे (५५, रा. कराड) यांना मधुमेहाचा त्रास आहे. पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांना उद्यमनगर येथील लक्ष्मीनारायण जनसेवा या विश्वस्त संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या पंत वालावलकर रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज दिला. रुग्णालयाचे बिल चौदा हजार रुपये झाले होते. त्यामुळे काकडे यांनी परिचित माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांना बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांशी बोलण्याची विनंती केली. दुपारी दीडच्या सुमारास रफिक याने डॉ. पठाण यांना मोबाईलवर संपर्क साधत मी माजी नगरसेवक आहे. लोक माझ्याकडे मदतीसाठी येत असतात. माझ्या नातेवाइकांचे बिल कमी करून द्यावे, असे सांगितले. त्यावर पठाण यांनी चार हजार रुपये कमी केल्याचे सांगितले. मुल्ला यांनी असे चालणार नाही, आणखी बिल कमी केले पाहिजे, असे सांगितले. यावरून दोघांच्यात वादावादी झाली. समोर रुग्ण असल्याने डॉ. पठाण यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर रफिक हा मित्र मयूर पाटील, हसन शेख यांना घेऊन रुग्णालयात आला. डॉ. पठाण यांच्या कक्षात घुसून शिवीगाळ करत कानशिलात लगावली. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रुग्णालयात डॉक्टरना मारहाण झाल्याने गोंधळ उडून कर्मचारी घाबरले. इतर रुग्णांचे नातेवाईकही बिथरून गेले. त्यानंतर डॉ. पठाण यांनी या तिघांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)