जयसिंगपूर : येथील रोटरी क्लब ग्रीन सिटी यांच्यातर्फे डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीच्यावतीने दादासो चौगुले, अविनाश पट्टणकुडे यांनी डॉ. खटावकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
चौगुले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राने कोविड काळात शहरासह परिसरासाठी योगदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. खटावकर यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ग्रीन सिटीतर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. अतिक पटेल, डॉ. अकलंक चौगुले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नंदकुमार बलदवा, बजरंग सोमानी, सचिन रायनाडे, जगदीप शेट्टी, राम बोंडगे, प्रसन्ना पाटील, अजितकुमार कोरे, शंकर बंडगर उपस्थित होते.
फोटो - ०१०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रोटरी क्लबच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांचा सत्कार करण्यात आला.