शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

चंद्रकांत पाटील यांची कागदपत्रांची जोडणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:04 PM

ऐनवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यास धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांची कागदपत्रांची जोडणी सुरूदिल्लीतून ठरणार निर्णय, ऐनवेळी धावपळ नको म्हणून दक्षता

कोल्हापूर : ऐनवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यास धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे.प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजप नेत्यांची इच्छा आहे; तर कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी मतदारसंघातूनही त्यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व गोष्टी युती होणार की नाही, यावरच अवलंबून आहेत.तरीही अमित शहा यांनी जर पाटील यांना निवडणूक लढविण्याची सूचना केली तर ती डावलणे शक्य होणार नाही. त्यामुळेच पाटील यांच्या निकटवर्तीयांनी उमेदवारीसाठी आवश्यक ना हरकत दाखले, गुन्हा नोंद नसल्याची पत्रे घेण्याचे काम जोरात सुरू केले आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन माणसे कामाला लावण्यात आली आहेत.मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलचंद्रकांत पाटील यांनी १९ सप्टेंबर २०१९ च्या पत्रानुसार मिरज पोलीस ठाण्यात आपल्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मागविली होती. त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी २४ सप्टेंबर रोजी त्यांना पत्र दिले असून त्यामध्ये या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले आहे.

२००९ साली ऐन गणेशोत्सवामध्ये जो जातीय तणाव निर्माण झाला होता, त्यावेळी पाटील यांच्यावर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १५४/१९ भादंविसं १४३, १४७ ते १४९, १८६, १८८, ३३७, ३३८, ४२७, ४३५ मुंबई पोलीस अ‍ॅक्ट ३७ (१) १३५ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रति. का. क. ३ (१)(२) (ड) ४ या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर