शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

डॉल्बी बंदीचे राजारामपुरीत विसर्जन

By admin | Published: September 18, 2015 12:30 AM

आवाज, झगमगाटाने मर्यादा सोडली : राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने नागरिक-पोलीस हतबल, इलेक्शन इफेक्ट

कोल्हापूर : गेले महिनाभर पोलीस प्रशासन, सामाजिक संघटनांनी चालविलेले डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे प्रयत्न पायदळी तुडवत राजारामपुरीतील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांनी बाप्पांचे स्वागत डॉल्बीच्या दणदणाटात केले. डॉल्बीचा छाती धडकावणारा आवाज आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईत मिरवणुका निघाल्या. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने, तसेच उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने संयमाची भूमिका घेतली; परंतु त्याचा परिणाम मात्र मिरवणूक रेंगाळण्यावर झाला. पोलीस खात्याने केलेल्या आव्हानाकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत अनेक मंडळांनी बिनधास्तपणे डॉल्बी साउंड सिस्टीम मिरवणुकीत आणली होती. जनता बझार चौक येथे गुरुवारी रात्री मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांत मोठी चढाओढ निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना सतत हस्तक्षेप करावा लागत होता. जनता बझार चौकातून या मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. या ठिकाणी काही प्रमुख मंडळांच्या मिरवणुकीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये राधेय तरुण मंडळाचे उद्घाटन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले; तर ‘एसएफ’ तरुण मंडळाचे उद्घाटन माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. राजारामपुरी तालीम मंडळ, सेनापती बापट मित्रमंडळ, जिद्द युवक संघटना या तरुण मंडळांचे उद्घाटन ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले.अनेक मंडळे भव्य एलईडी स्क्रीन व डोळे दिपवणारी एलईडी प्रकाशयोजना घेऊन मिरवणुकीत सहभागी झाली होती. अंधार पडताच अनेक मंडळांनी मिरवणुकीत आणलेली रंगीत, डोळे दिपवणारी एलईडी व शार्पी पद्धतीच्या विद्युत रोषणाईने मिरवणूक उजळवून टाकली होती. त्यामध्ये हल्ली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील गाण्यांसह, अन्य गाण्यांचा हंगामा होता. या मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली होती. राजारामपुरी आठवी गल्ली येथील जिद्द तरुण मंडळाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा पायंडा सुरू केला. त्यांनी सावंतवाडी, मावळ येथील ढोल-ताशांच्या गजरात मूर्तीचे आगमन केले.पहिल्या दिवशीच मिरवणूकशिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उत्तरेश्वरसह शहरातील अन्य पेठांतील मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीत प्रमुख मार्गावर राजारामपुरीसह अन्य मंडळांना स्थान मिळत नाही. त्यामुळे येथील अनेक मंडळांनी काही वर्षांपासून गणेश प्रतिष्ठापनेदिवशीच मिरवणूक काढायची, असा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जनता बझार चौक ते राजारामपुरीतील मारुती मंदिर अशा मार्गावरून ईर्ष्येने मिरवणूक काढली जातेया मंडळांनी साधली वेळ...जनता बझार चौकातून राजारामपुरीतील मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. सायंकाळी सात ते रात्री आठ या वेळेत या मुख्य मार्गावर येण्यासाठी अनेक मंडळांची धडपड सुरू असते. यंदा बलभीम तरुण मंडळ, अष्टविनायक, राजारामपुरी तालीम मंडळ, जिद्द युवक संघटना, वेलकम, व्ही. बाईज, गणेश फ्रेंडस् सर्कल या मंडळांनी सात ते दहाच्या दरम्यान मुख्य मार्गावर वेळ साधली.अनेक ठिकाणी डॉल्बीराजारामपुरीतच डॉल्बीचा दणदणाट झाला नाही, तर शहरातील उपनगरांतील अनेक ठिकाणी सर्रास डॉल्बी लावण्यात आला होता. आर. के. नगर, पाचगाव, संभाजीनगर, मिरजकर तिकटी परिसरातील मार्गावर अनेक मंडळांनी डॉल्बी लावतच ‘श्रीं’चे स्वागत केले.पोलीस व कार्यकर्त्यांची वादावादीराजारामपुरी येथील मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर येण्यासाठी अनेक मंडळांनी जनता बझार येथे आपल्या मंडळाचे ट्रॅक्टर व गणेशमूर्ती लावली होती. यामध्ये डॉल्बी असलेल्या मंडळांमुळे पारंपरिक वाद्ये असलेली मंडळे या ठिकाणी ताटकळत उभी होती. दुपारी चार वाजता पोलिसांनी थांबलेल्या मंडळांना आपली गणेशमूर्ती पुढे घेण्यास विनंती केली. यावेळी कोणत्याही मंडळाने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. अंधार पडू लागल्यानंतर मात्र प्रत्येक मंडळाची पुढे जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक मार्गातून जाण्यास सांगितले. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात वाद झाला.हतबल पोलिसांकडून केवळ डॉल्बींची नोंदनिवडणुकांच्या तोंडावर पोलीस प्रशासनाने या मिरवणुकीत जरी बघ्याची भूमिका घेतली असली तरी राजारामपुरीतील मुख्य रस्त्यांवरील मिरवणुकीत ज्या मंडळाने आवाजाची मर्यादा ओलांडली, त्या मंडळाचे, अध्यक्षांचे व डॉल्बीच्या मालकांचे नाव पोलिसांनी नोंद करून घेतले. अनेक मंडळे पोलीस आवाजाची तपासणी करीत आहेत, असे लक्षात घेता आवाज कमी करीत होती. पोलीस गेल्यानंतर पुन्हा आवाज वाढवीत होती. विशेष म्हणजे या साऱ्या मंडळांच्या मिरवणुकीच्या उद्घाटनास मान्यवर राजकीय मंडळींची उपस्थिती होती. त्यांच्यासमोरच हा डॉल्बीचा दणदणाट सुरु होता.घराघरांत मोरयाचा गजर!कोल्हापूर : भक्तजनांची विघ्ने वारी, ऐसा गजानन शेंदूर शमी बहु प्रिय ज्याला,तुरा दूर्वांचा शोभला उंदीर असे जयाते वाहन,माथां जडित मुगुट पूर्णनाग यज्ञोपावित रुळे,शुभ्र वस्त्र शोभित साजिरेभावमोदक हराभरी, भावे पूजा करी...आपल्या आगमनाने कुटुंबात नवचैतन्य, आनंद, सुख-समृद्धी आणणाऱ्या, भक्तांची विघ्ने दूर करणाऱ्या, विद्येचा दाता, सुखकर्ता, दु:खहर्ता, लाडक्या गणरायाचे गुरुवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. आयुष्यातील सगळे संघर्ष, ताणतणाव, धावपळ अशा सगळ्या रहाटगाड्यापासून दूर होत ‘अवघा रंग एक झाला’ म्हणत कोल्हापूरकर गणरायाच्या भक्तीत लीन झाले. गुरुवारची पहाट उगवली ती दारात सडा आणि रांगोळीच्या गालिच्याने. एकीकडे दाराला तोरण, घरातील दैवतांचे पूजन, खीर, मोदक पक्वान्नांचा नैवेद्य अशी तयारी सुरू असतानाच दुसरीकडे कुंभारबांधवांनी घडविलेला आपला देव नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी कुंभारवाडे फुलून गेले. गणरायाचे खरे वाहन उंदीर; पण ‘भाव तसा देव’ या उक्तीप्रमाणे बाप्पा दुचाकीपासून चारचाकीपर्यंत, बैलगाडीपासून हातगाडीपर्यंत, रथापासून बग्गीपर्यंत अशा भक्तांच्या विविध प्रकारच्या वाहनांत विराजमान होऊन जात होते. शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश हा शहराचा मध्यवर्ती परिसर. येथील कुंभारवाड्यांत सकाळपासून दारात आलेल्या भक्तांकडे त्यांचा देव सुपूर्द करण्यासाठी कुंभार बांधवांच्या कुटुंबीयांची लगबग सुरू होती.कुठे ताशांचा कडकडाट, कुठे सनईचे सूर, कुठे झांजपथकांचा ताल, तर कुठे लेझीमचा डाव अशा विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजरात भाविक गणपती बाप्पाला आपल्या घरी नेत होते. या अलोट गर्दीच्या व्यवस्थापनासाठी व सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असला तरी नागरिक स्वत:हून शिस्तीचे पालन करीत असल्याने कोणतीही गडबड, गोंधळ झाला नाही. मुलींच्या हाती गणपती बाप्पा रूढी-परंपरेतील समजुतीतून देवाची प्रतिष्ठापना पुरुषांनी करावी, अशी एक पद्धत आहे; पण गतवर्षीपासून मुलींच्या हातीही गणेशमूर्ती दिसू लागल्या आहेत. पुरोगामी कोल्हापूर आणि मुला-मुलींतील भेदाभेदांची सीमारेषा दूर करीत कित्येक मुली गणेशमूर्ती घेऊन जात असताना दिसत होत्या.मंडळांत उत्साह संचारलागणेशोत्सव : झांजपथक, ढोल-ताशे व फटाक्यांची आतषबाजी कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने मंडळांना इच्छुक उमेदवारांकडून डॉल्बीसाठी मिळालेली रसद... झांजपथकांचा दणदणाट... ढोल-ताशांचा कडकडाट... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार... फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात गुरुवारी शहरात सार्वजनिक तरुण मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. फुलांनी सजविलेली ट्रॅक्टर-ट्रॉली, वाहने घेऊन गणरायाला आणण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुपारी बारानंतर बाहेर पडले. पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, उचगाव या ठिकाणी मंडळांनी गर्दी केली होती. अनेक मंडळांनी आगाऊ नियोजन करून झांजपथक , लेझीम पथक, बँजो आपल्यासोबत घेतले होते. आपली मूर्ती ट्रॉलीवर घेतल्यानंतर त्यांचा गजर आणि ढोल-ताशांच्या कडकडाटावर कार्यकर्त्यांनी नृत्याचा फेर धरला होता; तर काही युवकांनी ट्रॉलीच्या पुढे मोटारसायकल घेऊन हॉर्न वाजवीतच गणेशमूर्ती घेऊन जाणे पसंत केले. काही कार्यकर्ते हातात मंडळाचे ध्वज आणि कपाळावर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या पट्ट्या बांधून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून स्वागत मिरवणूक काढली. बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सुभाष रोड, आदी मार्गांवरून मंडळांची अधिक वर्दळ होती. त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. राजारामपुरीतील मंडळांची स्वागत मिरवणूक जनता बझार चौकातून सुरू झाली. आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि ‘डॉल्बी’सह या मिरवणुकीत मंडळे सहभागी झाली होती. कार्यकर्ते बेभान होऊन नृत्य करीत होते. पारंपरिक बाजगुरुवारी पाटाकडील तालीम मंडळाच्या २१ फुटी ‘कोल्हापूरचा राजा’चे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. त्याचबरोबर जय पद्मावती, देशभक्त मदनलाल धिंग्रा, जय शिवराय तरुण मंडळ, अचानक तरुण मंडळ, अवचित पीर तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, उभा मारुती चौक तरुण मंडळ, सूर्या तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ (चिले कॉलनी), कलकल तरुण मंडळ, मंगळवार पेठ येथील लेटेस्ट तरुण मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, बजापराव माने तालीम मंडळ, संभाजीनगर तरुण मंडळ, बालेकिल्ला तरुण मंडळ, तुकाराम माळी तालीम अशा अनेक मंडळांच्या गणेशमूर्र्तींची प्रतिष्ठापना झाली.