शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

कोल्हापूर क्षेत्रात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 5:02 AM

तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रविवारी दिली.साताऱ्यात दोन वर्षांपूवी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजाने रस्त्याजवळील भिंत कोसळली होती. त्यात दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता. तर काही तरुण जखमी झाले होते. पोलिसांनी डॉल्बी चालकावर गुन्हा दाखल केला होता.‘लोकमत’ने त्यानंतर गणेश मंडळांच्या सहकार्याने वर्षभर डॉल्बीमुक्त अभियान राबविले. तसेच पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मोठा निधी उभा राहिला होता. त्यातून पीडितांचे पुनर्वसन करण्यास मदत झाली.डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती करणार आहे. गतवर्षी नियमबाह्य डॉल्बी लावणारी सार्वजनिक मंडळे, तालीम संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे, अशीही माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.आरोग्यावर दुष्परिणामडॉल्बीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. आगामी गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती केली जाणार आहे.