शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

By admin | Published: August 26, 2016 12:53 AM

पोलिसांना आव्हान : निष्पक्षपणे कारवाईची गरज

सचिन पाटील -- कोल्हापूर --गणेशोत्सवाचे वेध लागले की,पोलिस प्रशासन, सामाजिक संघटनांची ‘डॉल्बीमुक्ती’साठी धावपळ सुरू होते. नेटाने ते डॉल्बीमुक्तीसाठी बैठका घेतात. प्रसंगी कारवाईही करतात. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा ठोका वाजतोच आणि या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव घोषणेचा फज्जा उडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे खरंच यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करावयाचा असेल तर पोलिसांनी सर्वच मंडळांना एकाच तराजूत तोलून, राजकीय दबाव झुगारुन जागेवरच कारवाई करण्याची गरज आहे आणि याची सुरुवात प्रथम राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासूनच झाली पाहिजे. कोल्हापूरला पारंपरिक गणेशोत्सव मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. ती आजही काही मंडळांनी जपली आहे. मात्र, बदलत्या काळात डॉल्बी व मिरवणूक असे नवे समीकरण काही मंडळांनी स्वीकारले. जल्लोष साजरा करण्याच्या नावाखाली काळजाचा ठोका चुकविणारा आवाज, डोळे दीपवणारा झगमगाट, बेधुंद होऊन बीभत्सपणे नाचणारी तरुणाई असा नवा तर्क तरुणाईने करून घेतला. याचे सामाजिक व शारीरिक विपरीत परिणाम दिसू लागल्यावर डॉल्बी बंदीसाठी मोहीम तीव्र झाली. यात चांगले यशही पोलिस व सामाजिक संघटनांना आले. मात्र, कारवाईतील दुटप्पीपणा व कायद्यातील पळवाटा यामुळे ही मोहीम अद्यापही पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्ती करावयाची असेल तर तरुण मंडळांत प्रबोधनाची चळवळ तीव्र करण्याबरोबरच कारवाईचा हंटरही चालविणे आवश्यक आहे. जर हे झाले तरच खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीचा पहिला ठोका वाजेल.गणरायाची आगमन मिरवणूक राजारामपुरीत व विसर्जन मिरवणूक महाद्वारला हे दृश्य सध्या गणेशोत्सवात पहावयास मिळते. राजारामपुरीत दरवर्षी गणरायाचे आगमन धडाक्यात केले जाते. त्यामुळे मुख्य मार्गावर दणदणाट ऐकविण्यासाठी व झगमगाट दाखविण्यासाठी तरुण मंडळांत स्पर्धा लागलेली असते. या स्पर्धेत डॉल्बीमुक्तीचे तुणतुणे अक्षरश: फिके ठरल्याचा गेल्या दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉल्बीमुक्ती फाट्यावर बसवली जाते. त्यामुळे या ठिकाणी डॉल्बी वाजला तर त्याचे पडसाद पेठेतील इतर मंडळांत उमटतात. तेथे वाजतो तर विसर्जन मिरवणुकीत का नाही? या प्रश्नापुढे डॉल्बीमुक्तीचे तीन तेरा होतात. त्यामुळे पहिले मोठे आव्हान राजारामपुरीत डॉल्बीला रोखणे हे असणार आहे. तेथे ब्रेक लागला तर ‘डॉल्बी’चा दणका विसर्जन मिरवणुकीत नक्कीच फुसका ठरेल, हे उघड गुपित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीला बळ मिळेल.दोन बेसची पळवाटंमोठ्या डॉल्बीऐवजी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी म्हणजे डॉल्बीमुक्तीतील एक मोठी पळवाट आहे. कारण आज बाजारात ‘जेबीएल’सारख्या अत्याधुनिक साऊंड यंत्रणा आल्या आहेत. या केवळ दोन बेस दोन टॉपमधून मिरवणूक हादरवून टाकू शकतात. त्यांची आवाजाची मर्यादा १०० डेसिबलपेक्षा कितीतरी अधिक आहे. गुन्ह्याचीही भीती नाहीमिरवणुकीत एखाद्या मंडळाने डॉल्बी लावला तर आवाजाची तीव्रता तपासून पोलिसांकडून नंतर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अनेक कार्यकर्ते असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार असतात. काही मंडळांनी तसे कार्यकर्ते तयारच ठेवलेले असतात. मग केस पडली तर पडू दे, नंतर बघू, पण आता हलवून सोडू, अशीच मानसिकता त्यांची असते.