राजवर्धन निंबाळकर म्हणाले, विरोधकांच्या पाठबळावर राहुल पाटील अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी निधीचा बॅकलॉग भरून काढावा. राहुल आवाडे म्हणाले, राहुल यांना पाठिंबा देण्याची भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी आधीच घेऊन कोंडी फोडली होती. विजय भोजे म्हणाले, निधीचे समान वाटप करा. युवराज पाटील म्हणाले, सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय तेव्हा सर्वांना निधी द्या. उमेश आपटे म्हणाले, ६६ सदस्यांना आतापर्यंत किती निधी मिळाला याची आकडेवारी मांडून समानता आणा. मावळते अध्यक्ष बजरंग पाटील यांनी सभापती निवडीही बिनविरोध करण्याचे आवाहन केले.
यावेळी हंबीरराव पाटील, अंबरिश घाटगे, कल्लाप्पा भोगण, आकांक्षा पाटील, स्वाती सासने यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मावळते उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
चौकट -
बऱ्याच भानगडी होणार होत्या
या निवडणुकीत बऱ्याच भानगडी होणार होत्या. मुंबई, दिल्लीतून फोन आले. आता नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक वेळ देऊन सदस्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी व्यक्त केली.
चौकट-
सतेज पाटील यांचे नियोजन
सर्व सदस्य सभागृहात पोहोचेपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील हे या सर्व प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवून होते. पन्हाळ्यावरून सर्व सदस्य शासकीय विश्रामगृहावर आले. यावेळी पाटील यांच्या टीमने फेटे बांधण्याची यंत्रणा तयार ठेवली होती. राहुल यांच्यासाठी हाताचे चिन्ह असलेला फेटा, तर शिंपी यांच्यासाठी घड्याळाचे चिन्ह असलेला फेटा आणण्यात आला होता. इतक्या बारकाईने सतेेज पाटील यांनी नियोजन केले होते. आमदार ऋतुराज पाटील हेदेखील या दरम्यान सक्रिय होते.
कोट
नेतेमंडळी आणि सदस्यांच्या पाठबळावर अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेला साजेल असे काम करू. कोरोनाचा काळ असल्यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर राहील.
राहुल पाटील,
कोट
सभागृहाच्या मानमर्यादा सांभाळून काम केले जाईल. नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिला सदस्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक दिवस ठरविला जाईल.
जयवंतराव शिंपी
१२०७२०२१ कोल झेड पी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना असे उचलून घेत आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)
१२०७२०२१ कोल झेडपी ०२
शासकीय विश्रामगृहावर महाविकास आघाडीच्या सदस्यांसमवेत नेतेमंडळींनी असे समूह छायाचित्र काढले.