कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डाॅक्टर सेलच्यावतीने सोळांकूर ता. राधानगरी येथे ‘वाण आरोग्याचे’ या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात ४७२ महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन घेतले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बॅंकेच्या संचालिका अर्चना पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास पाटील, सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पद्मावती भोकरे यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरात डॉ. जयंता पाटील, डॉ अंजली शेट्टी, डॉ. अनिल आरळेकर, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. पूनम पाटील, डॉ. शैलेश पाटील, डॉ. हरिष पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. प्रताप नाळे, डॉ. विनायक लोहार, डॉ. वैभव पाटील डॉ. एस. व्ही. पांचाल, सदाशिव पाटील, विजय पाटील अविनाश कुंभार यांनी सहभाग घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगले, नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती मोहन पाटील, सरपंच आर. वाय. पाटील, पंचायत समिती सदस्या सोनाली पाटील, शीतल फराकटे, संजीवनी कदम उपस्थित होते.
फोटो ओळ-
राष्ट्रवादी महिला व डॉक्टर सेलच्यावतीने सोळांकूर ता. राधानगरी येथे ‘वाण आरोग्याचं’ या शिबिराचे उद्घाटन करताना अर्चना पाटील, शेजारी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील.