सेनापती कापशी : गेली पस्तीस वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी सामान्य माणूस कधी नजरेआड होऊ दिला नाही. सत्तेचा उपयोग सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठीच केला. लोकशाहीत पाय जमिनीवर ठेवून जनतेशी नम्रतेने वागावे लागते. सत्तेची हवा कधीच डोक्यात जाऊ देऊ नका. लोक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा कानमंत्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला.
माद्याळ (ता. कागल ) येथे आयोजित चिकोत्रा खोऱ्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार व माद्याळमधील चार कोटी ३१ लाख रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी युवानेते सूर्याजी घोरपडे म्हणाले, गट-तट न मानता मी जिल्हा परिषद मतदारसंघात काम केले आहे. माद्याळच्या विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. माद्याळचा पाणीप्रश्न सोडवून त्यांच्याच नेतृत्वाखाली माद्याळमध्ये विकासाची गंगा आणणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, धनाजी काटे, मारुती चोथे, उपसभापती दीपक सोनार, महादेव रानमाळे, सरपंच संगीता अरुण खोत, उपसरपंच मीनल चोथे, मारुती चोथे, आप्पासाहेब तांबेकर, लगमा कांबळे, प्रदीप चव्हाण, शामराव पाटील, दयानंद साळवी, दत्तात्रय चौगले उपस्थित होते.
फोटो : १४ माद्याळ सरपंच सत्कार
. माद्याळ, ता. कागल येथे चिकोत्रा खोऱ्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, यावेळी सूर्याजी घोरपडे, राजेखान जमादार, सरपंच संगीता खोत, उपसरपंच मीनल चोथे, मारुती चोथे, प्रदीप चव्हाण, लगमा कांबळे आदी उपस्थित होते