शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

हाॅटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:19 AM

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काहीअंशी हाॅटेल, रेस्टाॅरंट उघडू लागली आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी येथे सुरू होणार आहे. त्यात ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काहीअंशी हाॅटेल, रेस्टाॅरंट उघडू लागली आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी येथे सुरू होणार आहे. त्यात पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे खवय्यांनी पोट आणि कोरोना संसर्गापासून सावध राहणे गरजेचे आहे. हाॅटेल उघडली तरी जिभेचे लाड नको, पोट सांभाळणे गरजेची बाब बनली आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून हाॅटेल रेस्टाॅरंटमध्ये बसून जेवण, नाश्ता बंद आहे. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जस-जसा संसर्ग कमी होईल तसा निर्बंध कमी केले जात आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील हाॅटेल, रेस्टाॅरंट उघडणार आहेत. मात्र, लोकांनी कोरोना संसर्गाची जाणीव ठेवून सर्वत्र संचार करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

- भाजलेला मका खा. त्यामुळे व्हिटॅमिन्स मिळतात.

- आल्याचा अथवा तुळस घातलेला चहा प्यावा. त्यात चवीकरिता मध, लिंबूही टाकता येतो.

- ताज्या भाज्या खाव्यात. विशेषत: मोड आलेले कडधान्ये खावीत.

-ब्रोकोली, गाजर, मशरूम, टाॅमेटो उकडून खाले तर ते शरीरास खूप फायदेशीर टरते.

- थंडगार ज्यूस, शीतपेयेऐवजी विविध फळांच्या स्मुदी प्याव्यात.

- इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रमाणात ड्रायफ्रूट्स, फळे खावेत.

-मोरावळा खावा. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओटस यांपासून बनविलेले पदार्थ.

- दुधात सूंठ, हळद घालून प्यावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळावे.

- जड पदार्थ, मीठ जास्त असलेले पदार्थ

-रस्त्यावरील आंबवलेले पदार्थांपैकी इडली, डोसा

-शिळे अन्न पदार्थ खाऊ नका.

-रस्त्यावरील अन्न नकोच

अनेकदा रस्त्यावरील अन्नपदार्थ ज्या ठिकाणी केले जातात, ती जागा अनेकदा अस्वच्छ असते. त्यामुळे पदार्थांमधून रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असते. कोणत्या प्रकारचे तेल वापरले जाते याची माहिती नसते. याशिवाय अनेकदा दिवसभरात एकाच तेलात अनेकदा पदार्थ तळलेले असतात. त्यामुळे खाणाऱ्या शरीरात कोलस्ट्राॅल वाढणे, मळमळणे, पित्त होणे, पोट बिघडणे, शौचास लागणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यावरील अन्नपदार्थ न खाल्लेलच बरे. अनेक मंडळी गाडीवरील ज्यूसही पितात. त्यात कोणत्या प्रकारचे रंग, पाणी अथवा तत्सम पदार्थ वापरले जातात. याची माहिती नसते. त्यामुळेही आरोग्य धोक्यात येऊ शकते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळा आणि कोरोना काळात बाहेरील अन्नपदार्थांऐवजी घरातील खाद्यपदार्थ खावेत. वरण-भात, चपाती, भाकरी, भाजी, कोशिंबीर खावी. फळे खावीत. चांगली झोप घेणे आवश्यक बाब आहे. मधुमेही रुग्णांनी या काळात अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डाॅ. आशा जाधव, अध्यक्षा, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन

पावसाळ्यात भाज्या मिठाच्या पाण्यात धुवूनच वापराव्यात. उकडलेल्या भाज्यांचे सूप घ्यावेत. चायनीज व तळलेले पदार्थ खाऊ नयेत. घरचे अन्न केव्हाही चांगलेच असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ न खाललेच बरे.

- डाॅ. शरद पोवार, आयुर्वेदाचार्य

-

-