शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Kolhapur news: माणगावातील आंबेडकर स्मृती प्रकल्प धूळ खात पडून, उद्घाटनासाठी नेत्यांना नाही वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 2:11 PM

माणगाव येथे २० मार्च १९२० रोजी परिषद झाली होती. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाकडून त्याआधीच सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला

समीर देशपांडेकोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची ऐतिहासिक भेट ज्या माणगाव परिषदेत झाली, त्याच माणगाव, ता. हातकणंगले येथे डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आलेला प्रकल्प गेले तीन वर्षे धूळ खात पडून आहे. केवळ नेत्यांना वेळ नाही म्हणून या प्रकल्पाचे उद्घाटन रखडले असून, लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.माणगाव येथे २० मार्च १९२० रोजी परिषद झाली होती. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाकडून त्याआधीच सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला. जेथे ही परिषद झाली त्या ठिकाणी एक छाेटे सभागृह उभारण्यात आले आहे. जवळच आंबेडकर यांच्या लंडनमधील घराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही देखणी इमारत लक्षवेधी ठरली आहे.याच परिषदेमध्ये शाहू महाराज उपस्थित हरिजन बांधवांना म्हणाले होते की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. शाहू महाराजांचे हे भविष्य वास्तवात आले. त्यामुळेच ही परिषद महत्त्वाची मानली जाते. परंतु नेते मंडळींना वेळ नसल्याने या प्रकल्पाचेच उद्घाटन रखडले आहे. याचे कोणालाही सोयरसुतक नाही.

होलिओग्राफिक शोची यंत्रणा पडूनचया ठिकाणी ४० जणांना पाहता येईल अशी बैठक व्यवस्था करून माणगाव परिषदेचा होलिओग्राफिक शो दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून आपण त्या परिषदेमध्ये आहोत असा अनुभव या ठिकाणी घेता येतो. परंतु उद्घाटनच नसल्याने ही यंत्रणाही पडूनच आहे.

ठाकरे गेले, शिंदे आलेतत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्या वेळी प्रयत्न सुरू होते. परंतु पहिल्यांदा कोरोना आणि नंतर ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने हा हे लोकार्पण झाले नाही. परंतु नेत्यांच्या हस्ते उद्घाटन न करता हा प्रकल्प लवकर होणे आवश्यक असताना त्याबद्दल आमदार, खासदार, अन्य लोकप्रतिनिधीही गप्पच आहेत.

या प्रकल्पाचे अजून लोकार्पण झालेले नाही. हा प्रकल्प अजून शासनाकडून ग्रामपंचायतीच्या ताब्यात आलेला नाही. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर