डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा १८ वा वर्धापन दिन मंगळवारी छोटेखानी कार्यक्रमात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कुलपती डॉ. संजय पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहायक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, ईसीएचएस पाली क्लिनिकचे ऑफिसर इन्चार्ज कर्नल विलासराव सुळकुडे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी १८ वर्षे पूर्ण होणे हे प्रगल्भपणाचे लक्षण आहे. त्यामुळेच आमची सर्वांचीच जबाबदारी कितीतरी पटीने वाढली आहे. या जबाबदारीचे भान ठेवून यापुढे अधिक चांगले काम करून हॉस्पिटलचे नाव वेगळ्या उंचीवर पोहोचवू असा विश्वास दिला. प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून नव्या सेवा देण्याचा कुलपती डॉ. संजय पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असल्याचे सांगितले. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी नवे तंत्रज्ञान, साधनसामग्री याचा फायदा रुग्णांना व्हावा, असा प्रयत्न असल्याचे सांगितले.
फोटो : ०८ डीवायपी हॉस्पिटल
कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा १८ वा वर्धापन दिन केक कापून साजरा करताना कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा. समवेत प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय अधीक्षका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, कर्नल विलासराव सुळकुडे उपस्थित होते.